Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Nashik News : इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दी केली.
traffic
traffic esakal
Updated on

Nashik Traffic Problem : लोकसभा निवडणुकीच्या नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी (ता. २९) इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दी केली. यावेळी कार्यकर्त्यांची गर्दी होणार याची माहिती असतानाही शहर वाहतूक शाखेतर्फे ठोस नियोजन न केल्याने स्मार्ट रोडवर वाहतूकीचा पुरता बट्ट्याबोळ झाला. ऐनवेळी वाहतूक पोलिसांनी वाहतूक वळविली. परंतु यामुळे वाहनचालकांना मात्र मनस्तापाला सामोरे जावे लागले. (Nashik Traffic congestion lok sabha nomination)

लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांना नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करीत आहेत. सोमवारी (ता. २९) महाविकास आघाडीचे नाशिकमधून राजाभाऊ वाजे, दिंडोरीतून भास्कर भगरे तर, निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या स्वामी जनार्दन स्वामी मठाचे स्वामी शांतीगिरी महाराज, महाराष्ट्र निर्भय पक्षाचे जितेंद्र भावे यांनी कार्यकर्त्यांसह हजेरी लावत आपले उमेदवारी अर्ज सादर केले.

स्वामी शांतीगिरी महाराज हे आपल्या हजारो भाविकभक्तांसह रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. त्यावेळी वाहतूक शाखेच्या सरकारवाडा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांनी मेहेर सिग्नलकडून सीबीएसकडे जाणारी वाहतूक रोखली.

त्यामुळे मेहेर सिग्नल ते सिबीएसचा रस्ता बंद ठेवला तर. सीबीएसकडून मेहेर, अशोकस्तंभाकडे येणार वाहतूक सुरू ठेवली. परंतु उमेदवारासोबत आलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे तोही रस्ता बाधित झाला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या.

शांतीगिरी महाराज अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात असतानाच, महाविकास आघाडीचे उमेदवारही आपल्या कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजर झाले. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी होऊन वाहतूकीचा खोळंबा झाला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीसांची चांगलीच तारांबळ उडाली. (Latest Marathi News)

traffic
Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

यामुळे वाहतूक पोलिसांनी सीबीएसकडून वाहतूक शालिमार, शरणपूर रोडकडे वळविली. तर, एमजी रोडकडून येणारी वाहतूक अशोकस्तंभाकडे वळविण्यात आली. अशोकस्तंभाकडून सीबीएसकडे येणारी वाहतूक गंगापूर रोडकडे वळविण्यात आली. त्यामुळे स्मार्ट रोड दुपारपर्यंत वाहतूकीसाठी बंद करण्यात आलेला होता. परंतु यामुळे वाहनचालकांना चांगला मनस्ताप सहन करावा लागला.

नियोजनाचा अभाव

एकाचवेळी तीन उमेदवार हे हजारो समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत, हे ठाऊक असताना वाहतूक शाखेमार्फत आगाऊ नियोजन करण्याची आवश्यकता होती. परंतु, नियोजन नसल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहतूक पोलिसांची तारांबळ झाली. भरउन्हात वाहतूक कोंडीत अडकलेले वाहनचालक, शहर बसमधील प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.

नागरिकांना मनस्ताप

जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्यप्रवेशद्वार पोलिसांनी बंद केले. उमेदवारासमवेत पाच सदस्यांना परवानगी होती. परंतु तरीही कार्यकर्ते बळजबरीने आतमध्ये शिरले. त्याचा फटका जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या खासगी कामानिमित्ताने येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बसला. कार्यकर्ते समजून अनेकांना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ दिले नाही. विशेषत: ग्रामीण, आदिवासी भागातून आलेल्यांना पोलिसांच्या ससेमिऱ्याला सामोरे जावे लागले.

traffic
Latest Marathi News Update: दिवसभरात देशविदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()