Nashik News : खोदकामामुळे वाहतूक विस्कळित! पेठ रोडवर काँक्रिटीकरणाचे काम; एकेरी मार्गाने दुहेरी वाहतूक

Nashik News : ही बाब म्हसरूळ पोलिस ठाणे व वाहतूक शाखेला यांना कळविताच त्यांनी तत्काळ कर्मचारी पाठविल्याने वाहतूक कोंडी सुरळीत झाली.
Traffic jam from Rau Chowk on Peth Road.
Traffic jam from Rau Chowk on Peth Road.esakal
Updated on

पंचवटी : पेठ रोडवर सध्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मेघराज बेकरीपासून ते पाटापर्यंतचे एकेरी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून एकेरी मार्गाने दुहेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच मंगळवार (ता. २५) पासून राऊ चौकापासून काँक्रिटीकरणासाठी एका बाजूचा रस्ता खोदल्याने वाहतूक विस्कळित झाली होती. ही बाब म्हसरूळ पोलिस ठाणे व वाहतूक शाखेला यांना कळविताच त्यांनी तत्काळ कर्मचारी पाठविल्याने वाहतूक कोंडी सुरळीत झाली. (Traffic disrupted due to digging concreting work on Peth Road)

पेठ रोड मार्गे गुजरातकडे जाण्यासाठी पेठ रोड सोयीचा असून या मार्गावरून मोठ्या प्रमाणात लहान, मोठ्या व अवजड वाहनांची वाहतूक होत असते. पेठ रोडवर मनपा हद्दीत नवीन वसाहत मोठ्या प्रमाणात विकसित होत असल्याने नोकरदार वर्ग तसेच इतर नागरिक दैनंदिन कामानिमित्त आपल्या दुचाकी, चारचाकीवरून तर विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी वाहनाने प्रवास करतात.

राऊ हॉटेल ते मेघराज बेकरीपर्यंतचा मार्ग सोडून पुढे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम आहे. काँक्रिटीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने केले जाते. त्यामुळे यामुळे एका बाजूने एकेरी वाहतूक सुरू असते. त्यातच मंगळवारी राऊ हॉटेल चौकापासून मुक्तानंद बेकरीच्या बाजूने खोदकाम सुरू केल्याने या ठिकाणी चौकात मोठ्या प्रमाणात सायंकाळी वाहतूक कोंडी झाली होती. (latest marathi news)

Traffic jam from Rau Chowk on Peth Road.
Jalgaon News : लासूरचा ऐतिहासिक तलाव मोजतोय अखेरची घटका; झाडेझुडपे वाढल्याने झाली कचराकुंडी

या ठिकाणी चौफुली असल्याने त्यातच सिग्नल यंत्रणा बंद असल्याने रस्त्याच्या चारही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहन चालक वाहन आडवी तिडवी करून अजूनच वाहतूक कोंडीत भर टाकताना दिसून आले. सायंकाळी भाजीपाला वाहने पेठ रोड मार्गे गुजरातकडे जाण्यासाठी तर गुजरातकडून नाशिक शहराकडे येणारी लहान, मालवाहू , अवजड वाहने येत जात असल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

नियमितपणे वाहतूक कर्मचारी गरजेचे

पेठ रोडवरील राऊ हॉटेल चौकापासून रस्त्याच्या कॉँक्रिटीकरणाच्या कामाला सुरवात झाली आहे. सदरचे काम हे मेघराज बेकरीच्या पुढे सुरू होते. मंगळवारपासून राऊ चौकापासून मुक्तानंद स्वीट पासून एका बाजूने खोदकाम केले आहे. त्यामुळे या भागात नियमितपणे वाहतूक शाखेचे कर्मचारी नियुक्त केले तर वाहतूक कोंडी सुरळीत होण्यास मदत होईल.

Traffic jam from Rau Chowk on Peth Road.
Nashik Real Estate : महागड्या प्लॉटपेक्षा आपलं गावठाण बरं! जादा FSI, मध्यवर्ती भागामुळे पसंती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com