Nashik Traffic News : द्वारका चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच असते. मात्र सोमवारी (ता. १०) दुपारच्या वेळी द्वारका सर्कलकडून सारडा सर्कलकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. सारडा सर्कलवर गडकरी सिग्नलकडून येणारी वाहतुकीमुळे कोंडीची समस्या उद्भवली होती. मात्र, वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस नसल्याने बराच वेळी कोंडी कायम होती. त्याचा अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. (Nashik Traffic Dwarka to Sarda Circle traffic jam)
शहरातील काही रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यातही द्वारका सर्कल, मुंबई नाका, इंदिरानगर बोगदा, पाथर्डी फाटा, उपनगर नाक, बिटको सिग्नल, सिटी सेंटर मॉल सिग्नल, मेहेर सिग्नल, रविवार कारंजा, निमाणी चौफुली या ठिकाणी दररोज सकाळी आणि सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होत असते. दवारका सर्कलवर सिग्नल यंत्रणा असूनही वाहतूक कोंडीची समस्या असते. याठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीसांचे पथकही असते. परंतु अद्यापपर्यंत येथील कोंडी सुटू शकलेली नाही.
मात्र, सोमवारी (ता. १०) दुपारच्या वेळी द्वारका सर्कलकडून सारडा सर्कलकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या उदभवली होती. गडकरी चौकातून सारडा सर्कलकडे येणारी वाहतूक आणि द्वारकाकडून सारडा सर्कलकडे येणारी वाहतूक यांच्यात वाहतूकीला अडथळा निर्माण होऊन कोंडीची समस्या उद्भवली होती. (latest marathi news)
सर्कलभोवती वाहतूक फिरण्याऐवजी ती खोळंबल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे द्वारका सर्कलपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. परिणामी द्वारका सर्कलवर या कोंडीचा परिणाम झाला. त्यामुळे द्वारका सर्कलकडून येणाऱ्या वाहतुकीला मुंबई नाका सर्कलकडे वळविण्यात आले.
तर, सारडा सर्कल येथे वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी याठिकाणी वाहतूक पोलीस नव्हते. त्यामुळे वाहनचालकांनीच वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु यामुळे वाहतूक कोंडीत सापडलेल्या वाहनचालकांसह बसेसमधील प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.