पंचवटी : विधानसभा मतदान दीन बुधवार ता.२० रोजी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होती. त्यामुळे गुरुवार (ता. २१) रोजी फळभाज्या व पालेभाज्याची आवक वाढल्याने शेतकरी वाहनाची प्रवेशद्वारावर गर्दी वाढली. परिणामी दिंडोरी नाक्यापासून ते बाजार समिती गेट पावेतो जवळपास अर्धा ते पाऊण तास ट्रॅफिक जॅम झाली होती. मात्र, नंतर पंचवटी पोलिस व वाहतूक पोलिस यांनी ट्रॅफिक जॅम काढत वाहतूक पूर्ववत केली.