Nashik News : तपानंतरही बोगद्यातील वाहतूक कोंडी कायम! नागरिकांना रोजचा मनस्ताप

Nashik News : संबंधित अधिकाऱ्यांनी मंजूर आराखड्यानुसारच काम होणार असल्याचे सांगितल्याने स्थानिकांच्या सूचनांचा काही उपयोग झाला नाही
Tunnel under the flyover at Indiranagar.
Tunnel under the flyover at Indiranagar.esakal
Updated on

इंदिरानगर : सुमारे अकरा वर्षांपूर्वी उद्‌घाटन झालेल्या पाथर्डी फाटा ते द्वारका भागातील उड्डाणपुलाच्या किमान वर्षभर आधीपासून इंदिरानगर येथे झालेल्या बोगद्याच्या वाहतूक कोंडीची समस्या सुमारे एका तपानंतरही कायम आहे. बोगद्यासमोरचे गोविंदनगर आणि इंदिरानगरकडे जाणारे रस्ते हे १८ मीटर लांबीचे, तर बोगदा अवघ्या आठ ते दहा मीटर रुंदीचा तर उंची ३ मीटर आहे.

यामुळे काम सुरू असतानाच जाणकारांनी संबंधितांना ही बाब लक्षात आणून दिली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी मंजूर आराखड्यानुसारच काम होणार असल्याचे सांगितल्याने स्थानिकांच्या सूचनांचा काही उपयोग झाला नाही. (Nashik indiranagar tunnel marathi news)

येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी इंदिरानगर बाजूला रस्त्यालगत असलेले शनी मंदिर हटविले तरी त्याचा फारसा उपयोग झाला नाही. कमोदनगर भागातील पादचाऱ्यांना तर धोकादायकरीत्या महामार्ग ओलांडणे एवढाच पर्याय राहिल्यामुळे स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली.

यामुळे वाहतूक विभागाने उंच वाहनांना बोगद्यातून प्रवेश बंद, तर कधी एकेरी वाहतूक असे प्रयोग केले. तरीही २९ ऑगस्ट २०१७ ला शीतल तांबे आणि चिमुकला कुणाल या मायलेकाला रस्ता ओलांडताना अपघातात जीव गमवावा लागला. त्या वेळी खासदार हेमंत गोडसे यांना नागरिकांनी घेराव घालून या ठिकाणी त्वरित भुयारी मार्गाची मागणी केली.

त्याच टर्ममध्ये आमदार झालेल्या देवयानी फरांदे यांनी स्थानिक भाजप नगरसेवकांसह भुयारी मार्ग व वाहतूक कोंडी आंदोलनात उडी घेतली. या ठिकाणी सिग्नल बसविण्यात येईल, असे सांगितले. मात्र त्यालाही आता तब्बल सात वर्षांचा काळ उलटला आहे. वाहतूक शाखेने पुन्हा सुरू केलेली एकेरी वाहतूक आजपर्यंत येथे सुरू आहे.

कॅमेरे बसवले पण ते बंद तर भुयारी पादचारी मार्गाची अत्यल्प वापरामुळे दुरवस्था आहे. एकेरी वाहतुकीमुळे गोविंदनगरमार्गे येणाऱ्यांना मुंबई नाक्याकडे जाऊन वळसा घालून इंदिरानगरमध्ये यावे लागते. येथून उजवीकडे वळण्याचा पर्यायही पोलिसांनी बंद केला आहे. खासदार गोडसे यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये २७ फेब्रुवारी २०२२ ला शिवसेनेतर्फे पुन्हा एकदा येथे आंदोलन झाले.

गोडसे यांच्यासह तत्कालीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तांत्रिक व्यवस्थापक दिलीप पाटील येथे आले. त्या वेळी हा बोगदा दोन्ही बाजूला साडेसात मीटर वाढवत त्यांच्यावरून तीन मीटर उंचीचे दोन समांतर पूल बांधायचे, असा पर्याय सर्वांनी तत्वतः मान्य केला.

Tunnel under the flyover at Indiranagar.
Nashik News : 20 वर्षानंतर पाथर्डीला अधिकृत तक्रार क्रमांक

तीन महिन्यांत काम सुरू होईल, असे गोडसे यांनी त्या वेळी जाहीर केले होते. त्यास आता येत्या मंगळवारी दोन वर्षे पूर्ण होतील. गेल्या महिन्यात गोडसे यांनी या कामासाठी ४७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगत प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीने हे काम सुरू करण्यास सांगितले आहे.

"याच भागात लहानाचा मोठा झाल्याने ही समस्या काय आहे, याची जाण आहे. लोकप्रतिनिधींनी फक्त राजकारण केले आणि नागरिकांना वाऱ्यावर सोडून दिले आहे."

- ऋषिकेश वर्मा, शिवसेना, ठाकरे गट

"या बोगद्यातून दुहेरी वाहतूक व्हावी, आश्वासने मिळाली पण कार्यवाही झाली नाही. नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे."- हर्षद गोखले, स्थानिक नागरिक

"या अरुंद बोगद्याचा सर्वात मोठा त्रास कमोदनगरवासीयांना आहे. अजूनही पुढे किती वर्ष हेच हाल राहतील सांगता येत नाही."- निकिता पाठक, स्थानिक

"बोगद्यातील एकेरी वाहतुकीमुळे वाहनांचा इंधन खर्च वाढला आहे. येथील वाहतूक कोंडी दूर करत दुहेरी वाहतूक झाली पाहिजे."- सीमा प्रसाद (स्थानिक)

"इंदिरानगर सह राणेनगर बोगदाजवळ समांतर पूल टाकण्याबाबतच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरवात होण्याची अपेक्षा असून कायमस्वरूपी या समस्येवर तोडगा निघेल."

- दिलीप पाटील, तांत्रिक व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

Tunnel under the flyover at Indiranagar.
Nashik News : अंबड पोलिस ठाण्याचे निरीक्षक नजन यांनी आदल्या दिवशीच दिली होती घटनेची ‘हिंट’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.