Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक 12 तासांनंतर पूर्ववत; वाशिंदजवळ रुळावर झाड पडले

Central Railway : मध्ये रेल्वेच्या कसारा ते वाशिंद दरम्यान मुसळधार पावसामुळे रुळावर झाड पडल्याने मध्ये रेल्वेची वाहतूक रविवारी (ता. ७) सकाळपासूनच विस्कळित झाली.
Passengers stranded at Central Railway's Washind railway station as several trains ran late due to disruption of railway traffic due to mud and trees falling on the track.
Passengers stranded at Central Railway's Washind railway station as several trains ran late due to disruption of railway traffic due to mud and trees falling on the track.esakal
Updated on

Central Railway : मध्ये रेल्वेच्या कसारा ते वाशिंद दरम्यान मुसळधार पावसामुळे रुळावर झाड पडल्याने मध्ये रेल्वेची वाहतूक रविवारी (ता. ७) सकाळपासूनच विस्कळित झाली. त्यामुळे अप-डाउन मार्गावरील अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्याने प्रवाशांची चांगलीच अडचण झाली. काही गाड्या इगतपुरीपर्यंत नेण्यात आल्या, तर काही मनमाडमार्गे पुण्याहून मुंबईकडे वळविण्यात आल्या. यामुळ प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, रविवारी (ता. ७) सायंकाळी पाचनंतर वाहतूक पूर्ववत होत गेली, ती धिम्या गतीने सुरू होती. ( Central Railway was restored after 12 hours )

मुंबई परिसरात मुसळधार पावसामुळे वाशिंद रेल्वेस्थानक परिसरात रेल्वेरुळावर झाड पडले. त्याचबरोबर जोरदार पावसामुळे माती-वाळूचा मोठा भराव वाहून गेल्याने वाहतूक थांबवावी लागली. अनेक गाड्या भुसावळ, मनमाड, नाशिक रोड स्थानकातच थांबविण्यात आल्या. शहापूर भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक किती काळ विस्कळित राहणार, याची नेमकी माहिती अधिकाऱ्यांकडे नसल्याने प्रवाशांच्या संतापात भर पडत गेली. सोमवारी (ता. ८) पंचवटी व अन्य गाड्या धावणार की नाही, हे स्पष्ट झालेले नव्हते.

‘पंचवटी’ माघारी मनमाडला

मनमाड-नाशिक-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस कसारा घाटातून उतरल्यानंतर दोन डब्यांना जोडणारे कपलिंग तुटले. त्यामुळे इंजिन व एसी डब्यांसह गाडी पुढे आणि १८ डबे मागे राहिले होते. त्यामुळे पंचवटी एक्स्प्रेसच्या प्रवाशांना पाऊण तास उशिराने मुंबईला पोचावे लागले होते. रविवारी मुसळधार पावसामुळे महत्त्वाची पंचवटी एक्स्प्रेस अडकून पडली आहे. ती इगतपुरीला थांबविण्यात आली होती, नंतर ती मनमाडला परतली.

मुंबईहून नाशिकच्या दिशेने येणारी गोरखपूर पुढे रवाना करण्यात आली. काही गाड्या वसई, नंदुरबार, तसेच पुणे-दौंड-मनमाडमार्गे वळविण्यात आल्या. मुंबईला जाणारी राजधानी एक्स्प्रेस नाशिक रोडला थांबविण्यात आली होती. सेवाग्राम एक्स्प्रेस देवळाली स्थानकात उभी करण्यात आली होती. नाशिक रोड आणि देवळाली स्थानकातून रेल्वे प्रवाशांना बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. (latest marathi news)

Passengers stranded at Central Railway's Washind railway station as several trains ran late due to disruption of railway traffic due to mud and trees falling on the track.
Central Railway: सहा रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल! नागपुर स्थानकावरुन जाणार 'या' गाड्या

मुंबईहून मनमाडला व मनमाडमार्गे मुंबईला जाणाऱ्या गाड्या दौंडमार्गे वळवल्याने प्रवाशांचे हाल झाले. देवळाली स्थानकातून सेवाग्राम एक्स्प्रेसच्या प्रवाशांना २० खासगी बसने मुंबईला पाठविण्यात आले. काही गाड्या उशिरा येणार म्हणून ग्रामीण भाग तसेच परराज्यात जाणारे प्रवासी दिवसभर रेल्वेस्थानकातच बसून गाडीच्या प्रतीक्षेत होते. काही प्रवासी खासगी वाहनांनी मुंबईला गेले.

जळगाव-वसई रोड-दिवा वळविलेल्या गाड्या

-११०६० छपरा-एलटीटी मुंबई एक्स्प्रेस, १२२९४ प्रयागराज-एलटीटी एक्स्प्रेस, १२७४२ पाटणा जंक्शन-वास्को-दा-गामा एक्स्प्रेस, १४३१४ बरेली जंक्शन-एलटीटी एक्स्प्रेस.

गाड्या शॉर्ट टर्मिनेटेड

-२०७०५ जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस , १२१५२ शालिमार-एलटीटी आणि १२११० मनमाड-मुंबई-पंचवटी इगतपुरी येथे थांबविण्यात आली. ११०१२ धुळे-मुंबई नाशिक रोड येथे. १११२० भुसावळ-इगतपुरी मनमाड येथे. १२१४० नागपूर-मुंबई देवळाली येथे.

Passengers stranded at Central Railway's Washind railway station as several trains ran late due to disruption of railway traffic due to mud and trees falling on the track.
Central Railway : दादर-पंढरपूर एक्स्प्रेसचा मिरजमार्गे साताऱ्यापर्यंत विस्तार; 'या' जिल्ह्यांना पंढरपूरसाठी नवी गाडी

मनमाड-दौंड-पुणेमार्गे वळविलेल्या गाड्या

- १२१६८ बनारस-एलटीटी, १२१४२ पाटलीपुत्र-एलटीटी, १२८१२ हटिया-एलटीटी, ११०८० गोरखपूर-एलटीटी.

शॉर्ट ओरिजिनेटेड

- १०७०६ मुंबई-जालना वंदे भारत इगतपुरी येथे. १२०७१ मुंबई-हिंगोली डेक्कन जनशताब्दी एक्स्प्रेस नाशिक रोड येथे. १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस.

रविवारी सायंकाळनंतर वाहतूक पूर्ववत

भुसावळ विभागाच्या मुख्य रेल्वे व्यवस्थापक इती पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार शहापूर भागात मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वेगाड्या मनमाड, नाशिक रोड आदी स्थानकात थांबविण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना थोडा तरी दिलासा मिळाला. रेल्वे स्थानकांमध्ये मदत कक्ष आणि वैद्यकीय पथके तयार ठेवण्यात आली आहेत. युद्धपातळीवर काम केल्याने सायंकाळी वाहतूक सुरळीत करण्यात आली. खबरदारी म्हणून सोमवारपर्यंत रेल्वेगाड्या संथ गतीने धावतील.

Passengers stranded at Central Railway's Washind railway station as several trains ran late due to disruption of railway traffic due to mud and trees falling on the track.
Central Railway : जरंडेश्वर-सातारा ब्लॉकमुळे रेल्वेसेवा होणार विस्कळित; आजपासून 'या' गाड्या होणार रद्द

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.