वणी : श्रीक्षेत्र सप्तशृंगीगडाच्या घाट रस्त्याच्या सुरू असलेल्या दरड प्रतिबंधक उपाययोजनेसाठी २५ नोव्हेंबर २०२४ ते ९ जानेवारी २०२५ या कालावधीत नेमून दिलेल्या तारखेस सकाळी ६ ते दुपारी ११.३० या वेळेत घाटातील वाहतूक बंद असेल असे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अकुनुरी नरेश यांनी दिला आहे. सप्तश्रृंगीगड ते नांदुरी रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाययोजनेत जाळी बसविणे व बॅरिअर बसविणे हे काम प्रगतीपथावर आहे.