Nashik Traffic Problem : वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलिसांचा कारवाईचा दंडुका! बेशिस्त वाहनचालकांना ई-मशिनचा चाप

Traffic Problem : विविध भागात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे वाहतूककोंडी नित्याचीच बनली आहे.
police
policeesakal
Updated on

विनोद चंदन : सकाळ वृत्तसेवा

Nashik Traffic Problem : येथील विविध भागात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे वाहतूककोंडी नित्याचीच बनली आहे. त्यातच बेशिस्त वाहन चालकांमुळे निर्माण होणारी वाहतुकीची डोकेदुखी वाढत आहे. शहरातील मोसम चौक, एकात्मता चौक, रामसेतू पुल, सटाणा नाका, रावळगाव नाका, नवीन बसस्थानक, शिवतीर्थ, चर्च गेट, सरदार चौक, कुसुंबा रोड, पिवळा पंप आदी ठिकाणी रोज वाहतूक कोंडी होत असते. बेशिस्त वाहनचालकांना चाप बसण्याकरीता वाहतूक नियंत्रण शाखेने शहरात ई-मशिनद्वारे कारवाईचा दंडुका उगारला आहे. ( Police baton of action to solve traffic jam in malegaon )

दिवसभरात शंभरहून अधिक कारवाया ई-मशिनद्वारे शहरातील विविध भागात केल्या जातात. या ई-मशिनचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात मोटार वाहन अधिनियम कायदे अपलोड केले आहेत. बेशिस्त वाहन चालकांची चूक कोणती याचा फोटो ई-मशिनद्वारे लाईव्ह घेऊन त्याचा कायदा-कलम मशिनमध्ये सेट करून त्याचे ऑनलाइन चलन कापले जाते. ज्या व्यक्तीच्या नावे आरसी बुक असेल त्या व्यक्तीचे नाव, पत्ता, रजिस्टर मोबाईल क्रमांक उपलब्ध होवून दंडात्मक चलन कापल्याचा तत्काळ मेसेज जातो.

दंडात्मक रकमेचा भरणा ऑनलाइन कुठूनही करू शकतात किंवा रोख रक्कम वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांकडे देऊन पावती मिळू शकते. दंडात्मक भरणा वेळेत न केल्यास त्याची रक्कम वाहन चालकाकडून दुपटी, तिपटीने वसूल केली जाते. यात वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला वाहनचालकांशी बोलायची, नियम सांगायची गरजच भासत नाही. त्यामुळे दादा, काका, भाऊ, आबा, साहेब यांच्याशी संपर्क होतच नाही.

त्याची गरज भासत नाही. वाहन चालकानी रस्त्यावर गाडी उभी करणे, ट्रीपल सीट गाडी चालवणे, मोबाईलवर बोलणे, नो पार्किंग, रहदारीत अडथळा, विनाकारण हॉर्न वाजवणे, अवजड वाहने शहरातून चालविणे, कार पार्किंग, कारच्या काळ्या काचा या अनेक कारणांनी बेशिस्त वाहनचालक चुकीत सापडला तर दंडात्मक कारवाई होत आहे. (latest marathi news)

police
Nashik Traffic Problem: अनधिकृत थांब्यांनी चौकांचा कोंडला श्वास! वाहतूक कोंडी नित्याची; वाहतूक पोलिसांकडून होईना कारवाई

वर्दळीच्या ठिकाणी लक्ष केंद्रित

दंडात्मक कारवाईमुळे येथील वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे. वाहतूक पोलिस अधिकारी शहरातील वर्दळीच्या मुख्य ठिकाणी कर्तव्य बजावत आहे. वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करतानाच वाहतूक पोलिसांनी सायंकाळी शहरात ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी सोडवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.

मोटार वाहन कायदा दंडात्मक कारवाई

गाडीवर ट्रिपल सीट : १ हजार रुपये दंड

वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे : ५००

नो एंट्री, नो पार्किंग : ५००

कार काळी काच ब्लॅक फिल्म : ५००

मोठा ट्रक अडथळा : ५००

वाहतुकीला अडथळा : ५००

police
Nashik Traffic Problem : शरणपूर रोड ‘वन-वे’वर दुहेरी वाहतुकीमुळे कोंडी; फलक लावूनही वाहनचालकांकडून सर्रास घुसखोरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.