Shravan Traffic Change : श्रावणी सोमवारनिमित्त वाहतूक मार्गात बदल; सहायक आयुक्तांकडून आढावा

Shravan : नाशिक धार्मिक शहर म्हणून देशभरात प्रसिद्ध असल्याने येथील शिवमंदिरांमध्ये श्रावणमासात भाविकांची गर्दी होत असते.
Traffic Management
Traffic Managementesakal
Updated on

Shravan Traffic Change : येत्या सोमवारपासून (ता. ५) श्रावणमासाला प्रारंभ होतो आहे. नाशिक धार्मिक शहर म्हणून देशभरात प्रसिद्ध असल्याने येथील शिवमंदिरांमध्ये श्रावणमासात भाविकांची गर्दी होत असते. गोदाघाटावरील श्री कपालेश्वर मंदिरातही लाखों भाविकांची गर्दी होत असल्याने श्रावणमासात येथील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सुधाकर सुराडकर यांनी शनिवारी (ता. ३) श्री कपालेश्वर मंदिर, गंगापूर रोडवरील सोमेश्वर मंदिर परिसराची पाहणी करीत येत्या श्रावणमासात वाहतूक नियोजनाचाही आढावा घेतला. ( Traffic route changes on Shravan Monday )

यंदा श्रावणमासात ५ सोमवार आहेत. तसेच श्रावणमासालाही सोमवारपासूनच प्रारंभ होतो आहे. श्रावणात गोदाघाटावर सोमवार आणि शनिवारी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते. यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीचीही समस्या उद्‌भवते. या पार्श्वभूमीवर येथील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेले आहेत. हे बदल श्रावणमासातील प्रत्येक सोमवार व शनिवारी लागू असतील. तसेच, प्रवेश बंद असलेले मार्ग सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत बंद असतील, अशी अधिसूचनाच वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केली आहे.

मालेगाव स्टॅण्डकडून श्री कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग, खांदवे सभागृहाकडून श्री कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग, सरदार चौकाकडून श्री कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग, ढिकले वाचनालयाकडून श्री कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग हे श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी व शनिवारी वाहतुकीसाठी बंद राहतील. या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन उपायुक्त खांडवी यांनी केले आहे. (latest marathi news)

Traffic Management
Shravan 2024: यंदा श्रावण महिना कधीपासून सुरू होणार? पहिला श्रावणी सोमवार कधी? जाणून घ्या महत्व अन् तिथी

श्रावण मासानिमित्त पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील श्री कपालेश्वर मंदिरात श्रावण सोमवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये व सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी या परिसरात वाहतुकीत बदल केल्याची माहिती पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

श्रावण मासानिमित्त श्रावण सोमवारी पंचवटीतील तीर्थक्षेत्र रामकुंड परिसरातील श्री कपालेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होणार आहे. यामुळे परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी या परिसरात वाहतुकीत बदल केला आहे. वाहतुकीच्या नियोजनासाठी श्री कपालेश्वर मंदिराकडे येणाऱ्या वाहतूक मार्गांवर जसे की मालेगाव स्टॅन्ड, ढिकले वाचनालय, खांदवे सभागृह, शनि चौक, सरदार चौक याठिकाणी पहाटे ४ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत पंचवटी पोलिस ठाण्याकडून बॅरिकेटिंग केले आहे.

तरी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नागरिकांनी आपापली वाहने वरील मार्गाने घेऊन न येता ते जुने भाजी मार्केट पटांगण, म्हसोबा पटांगण, यशवंतराव महाराज समाधी मंदिराजवळील पटांगण या ठिकाणी आपापली दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंग करावीत, असे आवाहन पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कड यांनी केले आहे.

Traffic Management
Shravan 2024 : महाराष्ट्रातील महादेवांची सुप्रसिद्ध मंदिरे, यंदाच्या श्रावणात नक्की द्या भेट, मनोकामना होतील पूर्ण.!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.