Nashik Traffic Rules Break : चालकांनो थांबा, मगच बोला...! वाहन चालविताना मोबाईल असतो कानाला

Nashik News : अशा वाहनचालकांविरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गंभीर स्वरुपाची कारवाई वाहतूक शाखेकडून केली जाऊ शकते.
people talking on phone while driving
people talking on phone while drivingesakal
Updated on

Nashik Traffic Rules Break : दुचाकी असो वा चारचाकी, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. परंतु असे असले तरी बहुतांशी वाहनचालक हे जीवाचा धोका पत्करत वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करतात. यात दुचाकीचालकांची संख्या लक्षणीय आहे.

अशा वाहनचालकांविरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गंभीर स्वरुपाची कारवाई वाहतूक शाखेकडून केली जाऊ शकते. चालकाचा परवानाही रद्द होऊ शकतो. परंतु वाहतूक शाखाही याकडे गांभीर्याने बघत नसल्याने वाहनचालकांची मुजोरी वाढली आहे. अशा बेशिस्तांविरोधात कठोर कारवाईची आवश्यकता आहे. (Traffic Rules Break Drivers speak on mobile While driving)

नाशिक शहर वाहतूक पोलीस शाखेतर्फे सातत्याने दुचाकी वा चारचाकी वाहन चालविताना मोबाईलवर बोलणारे चालक, रहदारीच्या विरुदध दिशेने वाहन चालविणारे चालक आणि सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात असते. असे असले तरीही दुचाकी चालविताना मोबाईलवर अनेक चालकांचे संभाषण चालू असते. अशाचप्रकारे कारचालकही नजरेला दिसून येतात.

बर्याचदा, दुचाकी चालक हे एका हाताने मोबाईल धरून बोलतात तर दुसऱ्या हाताने दुचाकी चालवितात. काहीजण तर मान वाकडी करून मोबाईल बोलत असतात. काही दुचाकीचालक तर हेल्मेटच्या मध्ये मोबाईल अडकवून बोलत असतात. यातून लहान-सहान अपघात होतच असतात, तर भीषण अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अशाप्रकारे वाहन चालविणे स्वत:च्याच जीवावर बेतण्यासारखे आहे. (latest marathi news)

people talking on phone while driving
North West Mumbai: कीर्तीकरांच्या बाजूनं लागलेला निकाल वायकरांच्या बाजूनं कसा फिरला?

थांबून घ्या

दुचाकी वा चारचाकी वाहन चालविताना मोबाईलवर कॉल आला तर, त्यावर बोलणे अत्यावश्यकच असेल तर आपले वाहन रस्त्याच्या कडेला थांबून घ्यावे आणि मग त्यावर बोलावे. जेणेकरून त्यामुळे अपघाताची शक्यता मावळते.

यांच्यावरही व्हावी कारवाई

शहरात सध्या ऑनलाईन खाद्यपदार्थ हॉटेलमधून मागविण्यात येतात. त्यासाठी उबेर, जोमॅटो, स्विगी यासारख्या कंपन्यांचे डिलिव्हरी बॉईज दुचाकींवरून प्रवास करताना दिसतात. मात्र हे डिलिव्हरी बॉईज हेल्मेट वापरत नाहीत, त्यांच्याकडे वाहनाचे कागदपत्रांची पूर्तता असतेच असेही नाही. त्यामुळे वाहतूक शाखेने संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींना यासंदर्भात पाठपुरावा करून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची आवश्यकता आहे. 

"वाहने चालविताना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. लवकरच विशेष मोहिम राबविली जाणार आहे."

- चंद्रकांत खांडवी, उपायुक्त, शहर वाहतूक शाखा.

people talking on phone while driving
Nagar Loksabha Election: विखे-लंके वाद तापला... लंकेंच्या पीएवर जीवघेणा हल्ला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com