Nashik Police : सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण; विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाचा उपक्रम

Nashik News : विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातर्फे नाशिक परिक्षेत्रामध्ये सदरील उपक्रम राबविण्यात आला आहे.
Retired Police Officer Harish Baijal, Special Inspector General of Police Dattatray Karale while honoring female police officer Dwarka Doke who climbed Mount Everest and Nalini Kad who won the second place in the Ride with Rain competition at the Office of the Special Inspector General of Police.
Retired Police Officer Harish Baijal, Special Inspector General of Police Dattatray Karale while honoring female police officer Dwarka Doke who climbed Mount Everest and Nalini Kad who won the second place in the Ride with Rain competition at the Office of the Special Inspector General of Police.esakal
Updated on

Nashik Police : सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढते आहे. सायबर गुन्हेगारीविरोधात सुरक्षात्मक उपाययोजना व प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी नाशिक परिक्षेत्रातील सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातर्फे नाशिक परिक्षेत्रामध्ये सदरील उपक्रम राबविण्यात आला आहे. (Nashik Training students to curb cyber crimes)

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सायबर गुन्हेगारी, रस्ते सुरक्षा आणि मालमत्तेविरोधातील गुन्हे यांना प्रतिबंध करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर प्रशिक्षण उपक्रम परिक्षेत्रातील नाशिकसह अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदूरबार या जिल्ह्यात राबविण्यात आला.

यात नाशिक परिक्षेत्रातील १३७ पोलीस ठाण्यांतर्गत राबविलेल्या या उपक्रमांत १३९ शाळा-महाविद्यालयांनी सहभाग घेतला. यात ७५० शिक्षक आणि १८ हजार ४२३ विद्यार्थ्यांनी सहभागी होत प्रशिक्षण उपक्रमांला प्रतिसाद दिला. (latest marathi news)

Retired Police Officer Harish Baijal, Special Inspector General of Police Dattatray Karale while honoring female police officer Dwarka Doke who climbed Mount Everest and Nalini Kad who won the second place in the Ride with Rain competition at the Office of the Special Inspector General of Police.
Eknath Shinde: मोठी बातमी! अजित पवारांशिवाय लढण्यासाठी शिंदेंचा प्लॅन रेडी? राष्ट्रवादीकडे असलेल्या 'या' आठ मतदारसंघांमध्ये निरीक्षक नेमले

यांचा केला सन्मान

विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात गुरुपौर्णिमेच्या औचित्याने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी हरिष बैजल  यांच्यासह ५० सेवानिवृत्त अधिकार्यांचा सन्मानित करण्यात आले. तसेच, यावेळी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केलेल्या पोलिस दलातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी द्वारका डोके आणि ‘राईड विथ रेन’ या राज्यस्तरीय सायकल राईड स्पर्धेत १ हजार ७८९ कि.मी. चे अंतर पार करीत द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या नलिनी कड यांचाही यावेळी सन्मान करण्यात आले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांची प्रमुख उपस्थीती होती. सहायक निरीक्षक नयना आगलावे यांनी सूत्रसंचालन केले तर, उपअधीक्षक रामराव ढिकले यांनी आभार मानले.

Retired Police Officer Harish Baijal, Special Inspector General of Police Dattatray Karale while honoring female police officer Dwarka Doke who climbed Mount Everest and Nalini Kad who won the second place in the Ride with Rain competition at the Office of the Special Inspector General of Police.
Murtijapur News : विद्यार्थ्यास मुख्याध्यापकांकडून मारहाण; सिईओंकडे पालकाची तक्रार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.