Nashik NMC : महापालिका मुख्यालयात बदलीचा सिलसिला कायम; तांत्रिक संवर्गात लवकरच फिरणार भाकरी

Nashik News : आठ ते दहा वर्षांपासून एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर प्रशासनाने दुसरा झटका देत पुन्हा नव्याने १३ कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करत भाकरी फिरविली आहे.
NMC Nashik
NMC Nashik Newsesakal
Updated on

Nashik News : आठ ते दहा वर्षांपासून एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर प्रशासनाने दुसरा झटका देत पुन्हा नव्याने १३ कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करत भाकरी फिरविली आहे. विभागप्रमुखांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन काही कर्मचाऱ्यांची पुनर्स्थापनादेखील करण्यात आली. (Transfer continues in municipal headquarters)

महापालिका मुख्यालय सहा विभागांमध्ये गेल्या आठ ते दहा वर्षांपासून एकाच टेबलवर काम करणाऱ्या जवळपास सव्वाशे कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासनाने अचानक केल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली. रात्री उशिरा पुन्हा नव्याने १३ कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली.

यातील काही कर्मचाऱ्यांचे कामकाज आक्षेपार्ह असल्याने त्यांना, आहे त्या जागेवरून उचलणे आवश्यक होते. त्याअनुषंगाने या बदल्या करण्यात आल्या आहेत, मात्र त्याचबरोबर काही विभागांकडून कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून तातडीने बदली झालेल्या कर्मचाऱ्यांचे पुनर्स्थापना करण्याचीदेखील मागणी करण्यात आली. (latest marathi news)

NMC Nashik
Nashik News : 7 वर्षांपासून बागवानी संशोधन केंद्राला संचालक नाही; नाशिक केंद्र विजनवासात कारभार दिल्लीच्या हाती

त्यांना प्रशासनाने प्रतिसाद देताना जवळपास पाच ते सहा कर्मचाऱ्यांना पुन्हा आहे, त्याच जागेवर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात तांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्यादेखील बदल्या केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर वरिष्ठ कर्मचाऱ्यांनादेखील बदलीला सामोरे जावे लागणार आहे.

दरम्यान बदल्यावरून ‘कही खुशी कही गम’ असे वातावरण महापालिका वर्तुळात आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षांपासून बदलीसाठी अर्ज दाखल केले आहे, त्यांच्या बदल्या न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. तर मलईदार पदावरून ज्यांच्या बदल्या झाल्या, त्यांच्याकडून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली गेली.

NMC Nashik
Nashik Monsoon Update: पश्चिम पट्ट्यातील पावसामुळे म्हाळुंगी नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर वाढ! शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.