मालेगाव : येथील महापालिकेत काही अधिकाऱ्यांसह लिपिकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अचानक झालेल्या बदल्यांमुळे येथे खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अधिकारी, कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त रवींद्र जाधव यांनी बदल्यांचे हत्यार उगारले. (Transfer of 125 people in Malegaon Municipal Corporation)
बदल्यांमुळे कामात सु:सूत्रता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर विविध कामांबाबत सातत्याने आरोप केले जात आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सहाय्यक आयुक्त अडकल्यानंतर आरोपांमध्ये वाढ झाली. एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी विविध पक्ष-संघटनांकडून केली जात होती.
विशेषत: सोशल मिडीयावर आरोपांच्या फैरी झडत होत्या. आयुक्त जाधव यांनी कामात सु:सूत्रता आणण्यासाठी सुमारे १२५ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अन्य विभागात बदल्या केल्या. गुरुवारी (ता. ११) सायंकाळी संबंधितांना बदलीचे आदेश पारीत करण्यात आले. शुक्रवारपासून (ता. १२) संबंधितांना नवीन कामाची जबाबदारी स्विकारावी लागणार आहे. (latest marathi news)
महापालिकेतील लेखाधिकारी राजू खैरनार, प्रभाग अधिकारी हरिश डिंबर, प्रभाग अधिकारी शेख फैय्याज यांच्यासह सुमारे १२५ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. शिपाई वगळता इतर सर्व अधिकारी, कर्मचारी घटकांचा बदल्यांमध्ये समावेश आहे. गार्डन अधिक्षक निलेश पाटील यांची आयुक्तांचे स्विय सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
येत्या काही दिवसांत आणखी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सुतोवाच व्यक्त केले जात आहेत. नागरीकांची कामे वेळेवर व्हावीत. कामात सु:सूत्रता व अधिक पारदर्शकता आणण्यासाठी बदल्या करण्यात आल्याचे आयुक्त जाधव यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.