Nashik Police Transfers : राज्यातील 379 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या! आयुक्तालयात 7 तर ग्रामीणमध्ये 5 निरीक्षक येणार

Nashik News : महाराष्ट्र पोलिस दलातील ३७९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश जारी झाले आहेत. या बदल्यांमध्ये विनंती बदल्यांचाही समावेश आहे.
Nashik Police Transfers
Nashik Police Transfersesakal
Updated on

Nashik News : महाराष्ट्र पोलिस दलातील ३७९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश जारी झाले आहेत. या बदल्यांमध्ये विनंती बदल्यांचाही समावेश आहे. नाशिक शहर आयुक्तालयात नव्याने ७ तर ग्रामीणमध्ये ५ पोलिस निरीक्षक रुजू होतील. महाराष्ट्र राज्य पोलिस आस्थापना कार्यालयाचे अपर पोलिस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. (Nashik Police Transfers)

लोकसभा निवडणूक आटोपताच रखडलेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाचे (एसआयडी) विश्वजीत जगताप, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाचे संजीव फुलपगारे, जात प्रमाणपत्र तपासणी समितीचे अतुल डहाके, नागपूरचे जग्वेंद्रसिंग राजपूत.

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील डॉ. अंचल मुदगल, ठाणे बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे जयंत शिरसाट, दहशतवादी विरोधी पथकाचे सचिन खैरनार यांची नाशिक शहर आयुक्तालयात रुजू होणार आहेत.

तसेच, विशेष सुरक्षा विभागाचे समीर केदार, धुळे येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे हेमंतकुमार भामरे, धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्राचे गणेश गुरव, योगेश घोरपडे, दहशतवादी विरोधी पथकाचे राहुल मोरे हे नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात रुजू होतील. (latest marathi news)

Nashik Police Transfers
Nashik Encroachment : विधीमंडळातील लक्षवेधीनंतर अतिक्रमण कारवाई! शहरातील 2 हजार 791 अतिक्रमण धारकांना नोटिसा

यांची बदली (कंसात बदलीचे ठिकाण)

नाशिक गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाचे किशोरकुमार परदेशी (धुळे), शहर आयुक्तालयातील दहशतवादविरोधी पथकाचे शंकर खटके (सीआयडी), अनिल पाटील (नंदूरबार), महेंद्र चव्हाण (नंदूरबार), दिनेश शेंडे (दहशतवादी विरोधी पथक), ग्रामीणचे नंदकुमार कदम (नवी मुंबई), गोकूळ औताडे (नागरी हक्क संरक्षण), शहर आयुक्तालयातील भरतसिंग पराडके (मुदतवाढ).

नाशिक जात प्रमाणपत्र तपासणी समितीचे रंगराव सानप (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण), मुरलीधर कासार (जळगाव), ज्योती करंदीकर (मुदतवाढ), महाराष्ट्र पोलिस अकादमीतील संजय तुंगार (सीआयडी), मनिषा राऊत (नाशिक ग्रामीण), द्वारका डोखे (ठाणे), सीमा परिहार (जात प्रमाणपत्र तपासणी समिती).

Nashik Police Transfers
Nashik News : मध्यप्रदेश सरकारकडून सीमेवरील नाके बंद!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.