Nashik Officers Transfer : जिल्ह्यातील 7 गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या! निफाड गटविकास अधिकाऱ्यांची अखेर बदली

Latest Nashik News : बदली झाल्याने जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व अधिकाऱ्यंना कार्यमुक्त केले आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र विकास सेवेतील गटविकास अधिकारी संवर्गाच्या बदल्या करण्यात आल्या.
officer transfer
officer transferesakal
Updated on

Nashik Officers Transfer : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सात गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात कळवण, मालेगाव, बागलाण, त्र्यंबकेश्‍वर, निफाड, दिंडोरी आणि नांदगाव या तालुक्यांचा समावेश आहे. या ठिकाणी इतर जिल्‍ह्यांतील कार्यरत असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. यात मंत्री छगन भुजबळ यांनी विशेषाधिकार भंगाची तक्रार केलेल्या निफाड गटविकास अधिकारी यांचाही समावेश आहे. (Transfer of 7 group development officers in district)

दरम्यान, बदली झाल्याने जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व अधिकाऱ्यंना कार्यमुक्त केले आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र विकास सेवेतील गटविकास अधिकारी संवर्गाच्या बदल्या करण्यात आल्या. याबाबतचे शासन आदेश निघाले असून, यात नाशिक जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांमध्ये कार्यरत असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

या रिक्त झालेल्या जागांवर राज्य शासनाने तत्काळ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. मंत्री भुजबळ यांना त्यांच्याच मतदारसंघातील लोकार्पण सोहळ्याला निमंत्रण न दिल्याने त्यांनी जिल्हा परिषद माजी सदस्यांसह जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात विधानसभेच्या अध्यक्षांकडे विशेषाधिकार भंगाची तक्रार दाखल केली होती.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने संबंधित ग्रामसेवकाच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर केला. संबंधित गावाच्या सरपंच, उपसरपंच यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे दाखल झाला होता. यात गटविकास अधिकाऱ्यांच्या विरोधातही तक्रार होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात होती. अखेर त्यांची बदली झाली आहे. (latest marathi news)

officer transfer
Majhi Vasundhara Abhiyan 4.0 : माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये नाशिकचा डंका! 14 बक्षीसे मिळवत चौथ्या वर्षीही राज्यात अग्रेसर

बदली झालेले अधिकारी (कंसात नियुक्ती ठिकाण)

एन. एस. पाटील (जावळी, सातारा), ए. जी. पवार (धरणगाव, ज‌ळगाव), लता गायकवाड (मुरबाड, ठाणे), श्रीकिसन खातळे (अंजनगाव सुर्जी, अमरावती), महेश पाटील (चोपडा, जळगाव), नम्रता जगताप (शहापूर, ठाणे), संदीप द‌ळवी (कोपरगाव, अहमदनगर).

बदलीहून आलेले अधिकारी (कंसात तालुका)

आर. ओ. वाघ (ता. कळवण), सी. सी. साबळे (ता. मालेगाव), ए. जे. पाटील (ता. बागलाण), जी. एम. लेंडी (ता. त्र्यंबकेश्वर), टी. बी. जाधव (ता. निफाड), बी. एस. रेंगडे (ता. दिंडोरी), डी. ए. कोतवाल (ता. नांदगाव), एस. जी. पाठक (सहाय्यक गटविकास अधिकारी, ता. नांदगाव)

officer transfer
Nashik News : जिल्ह्याने जपल्‍या महात्‍मा फुलेंच्‍या खुणा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या हस्‍ते झाले होते पुतळ्याचे अनावरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.