Nashik ZP News : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या लांबणीवर! नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेचा फटका

Nashik News : जिल्हा परिषदेच्या नियमित कर्मचारी बदल्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
Nashik ZP
Nashik ZP esakal
Updated on

Nashik News : जिल्हा परिषदेच्या नियमित कर्मचारी बदल्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जूनला असल्याने त्यानंतर या बदल्या करण्याची तयारी प्रशासनाने केली होती. मात्र, नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लगेचच लागू झाली असल्याने ही आचारसंहिता संपल्यानंतर बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. (transfer of Zilla Parishad employees is delayed)

त्यामुळे साधारण १५ जूननंतर बदल्या होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया दर वर्षी मेमध्ये राबवली जात असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागतात. गेल्या वर्षी मेमधील शेवटच्या आठवड्यात कर्मचारी बदली प्रक्रिया पार पडली होती.

यंदा मात्र लोकसभेची निवडणूक असल्याने बदल्यांचा कालावधी महिना ते दीड महिना लांबणीवर पडला आहे. ४ जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे. त्यानंतरच बदली प्रक्रिया राबविली जाणार होती. मात्र, तोपर्यंत जिल्हा प्रशासनाने बदल्यांची सर्व तयारी सुरू केली.

५ एप्रिलला सामान्य प्रशासन विभागाने पत्र काढत २१ एप्रिलपर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश सर्व खातेप्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. यात २० एप्रिल २०२४ पर्यंत सेवाज्येष्ठता यादी तयार करणे, २१ ते ३० एप्रिलदरम्यान ज्येष्ठता यादीवर हरकती, आक्षेप नोंदविणे, १ ते १० मेदरम्यान हरकतींचे निराकरण करून अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे, बदलीसाठी विकल्प, विनंती अर्ज सादर करून यादी तयार करणे याचा समावेश आहे. (latest marathi news)

Nashik ZP
Nashik News : नाव मागेल त्याला, शेततळ्याला खिशातून पैसे घाला! अनुदानात वाढीची शेतकऱ्यांची मागणी

सामान्य प्रशासन विभागाने ही तयारी अंतिम केली आहे. ४ जूनला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आचारसंहिताही शिथिल होईल. त्यानंतर ही बदली प्रक्रिया राबविण्याबाबत प्रशासनाने तयारी केली होती. मात्र, या निवडणुकीच्या धामधुमीत नाशिक शिक्षण मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे.

या मतदारसंघासाठी १० जूनला मतदान होत असून, १३ जूनला निकाल घोषित होणार आहे. साधारणतः १५ जूनपर्यंत ही प्रक्रीया पूर्ण होईल त्यानंतर आचारसंहिता शिथिल होणार आहे. त्यामुळे कर्मचारी बदली प्रक्रियाही १५ जूननंतर राबवावी लागणार आहे. बदली प्रक्रिया लांबत असल्याने कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

Nashik ZP
Nashik News : ड्रग्जप्रकरणातही वैभवची झाली होती चौकशी; कुस्तीपटू लहामगे खून प्रकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com