Nashik Teachers Transfer : जिल्ह्यातील 98 शिक्षकांच्या विनंती बदल्या

Latest Nashik News : ही प्रक्रिया राबविली गेल्यानंतर मात्र अनेक शिक्षक विनंती बदली करण्यासाठी शिक्षण विभागात ये-जा करत शिक्षणाधिकाऱ्यांकडे हट्ट करत होते. त्यासाठी पालकमंत्र्यांमार्फतदेखील दबाव टाकला जात असल्याची चर्चा होती.
Teachers Transfer
Teachers Transferesakal
Updated on

Nashik Teachers Transfer : तालुकांतर्गत बदलीप्रक्रिया राबविण्याच्या मागणीसाठी आग्रही झालेल्या शिक्षकांची मागणी अखेर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पूर्ण केली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने सोमवारी (ता. १४) ९८ शिक्षकांच्या तालुकांतर्गत विनंती बदल्या करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी दिली. यातील बहुतांश बदल्या बिगरआदिवासी तालुक्यांमधील आहेत. (Transfer requests of 98 teachers in district)

नवीन शिक्षकभरती प्रक्रियेपूर्वी शिक्षकांच्या विनंती बदल्या करण्यात याव्यात, असे परिपत्रक राज्य शासनाने काढले आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हांतर्गत बदलीप्रक्रिया राबविण्याची प्रक्रिया करणार असल्याचे सांगितले; परंतु राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदांनी या बदल्या करण्याचे टाळले होते.

यातच, नाशिक विभागातील जिल्हा परिषदांनी ही कार्यवाही केली नाही. याचाच आधार घेत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागानेही ही बदलीप्रक्रिया करण्यास नकारघंटा दर्शविली होती. त्यामुळे बदलीपात्र संतप्त झालेल्या शिक्षकांनी गेल्या महिन्यात जिल्हा परिषदेत धडक मारत बदल्यांचा आग्रह धरला होता.

मात्र, त्यानंतरही विविध शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे विनंती बदल्यांची मागणी केली. अखेर, शिक्षक संघटनांची मागणी लक्षात घेऊन शिक्षण विभागाने सोमवारी विनंती बदलीप्रक्रिया राबविली. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, शिक्षणाधिकारी बच्छाव यांच्या उपस्थितीत मविप्रच्या एका महाविद्यालयात ही प्रक्रिया राबविण्यात आली.

यात संवर्ग एकसाठी १९३, संवर्ग दोनसाठी ८९, तर संवर्ग चारसाठी १८६ असे एकूण ४६८ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी ३७० शिक्षकांनी बदलीला नकार दिला. त्यानंतर ९८ शिक्षकांच्या बदली करण्यात येऊन त्यांना तत्काळ नियुक्तिपत्रही देण्यात आले. मंगळवारी (ता. १५) या शिक्षकांना बदली झालेल्या ठिकाणी हजर राहण्याचेदेखील आदेश दिले आहेत. (latest marathi news)

Teachers Transfer
Sharad Pawar: शरद पवार गटातून मुरबाड विधानसभा मतदारसंघात 'या' नावाची चर्चा

तालुकानिहाय बदली झालेले शिक्षक

दिंडोरी (३), चांदवड (५), नांदगाव (२३), निफाड (५), देवळा (३), मालेगाव (३०), येवला (७).

नकार दिलेल्या शिक्षकांचा बदलीसाठी हट्ट

बदलीसाठी अर्ज करण्यासाठी विभागाने मुदत दिलेली होती. या मुदतीत आलेल्या शिक्षकांना विचारणा करण्यात येऊन यातील तब्बल ३७० शिक्षकांनी बदलीला नकार दिला. त्यानंतर प्रक्रिया राबविली गेली. ही प्रक्रिया राबविली गेल्यानंतर मात्र अनेक शिक्षक विनंती बदली करण्यासाठी शिक्षण विभागात ये-जा करत शिक्षणाधिकाऱ्यांकडे हट्ट करत होते. त्यासाठी पालकमंत्र्यांमार्फतदेखील दबाव टाकला जात असल्याची चर्चा होती.

Teachers Transfer
Petrol Pump Strike : ...अन्‍यथा ३१ ऑक्‍टोबरला पेट्रोलपंप बंद! पेट्रो डीलर्स वेल्फेअर असोसिएशनचे प्रशासनाला निवेदन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.