NMC News : महापालिका अंतर्गत बदल्या शासन दरबारी? महत्त्वाच्या सेवांवर ताण

NMC : महापालिकेत गेल्या काही दिवसांमध्ये चुकीच्या पद्धतीने बदल्यांचा सिलसिला सुरू झाला आहे. विशेष करून बदल्या करताना नगररचना व बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या जात आहे.
NMC
NMC esakal
Updated on

NMC News : ज्येष्ठता डावलून महापालिकेत अंतर्गत बदल्या करताना पाणीपुरवठा व मलनिस्सारण या फारशा मलईदार नसलेल्या विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यातून महत्त्वाच्या सेवांवर ताण निर्माण होऊन सेवा कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शासनाकडे बदल्या संदर्भात तक्रारी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.(Nashik Transfers within municipality)

महापालिकेत गेल्या काही दिवसांमध्ये चुकीच्या पद्धतीने बदल्यांचा सिलसिला सुरू झाला आहे. विशेष करून बदल्या करताना नगररचना व बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या जात आहे. विशेष म्हणजे बदल्या करताना नियम डावलले जात आहे.

नगररचना विभागात उपअभियंता पदी काझी नामक दोन पदभार असलेल्या अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली. नगररचना विभागात उपअभियंता असलेल्या विशाल गरुड यांच्याकडे तीन कार्यभार होते. त्यांच्या जागी सिडको विभागात कार्यरत असलेल्या शिंगाडे नामक वादग्रस्त अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली.

गरुड यांना मलनिस्सारण विभागात रस नसल्याने आता ते बांधकाम विभागात बदलीसाठी प्रयत्नशील आहेत. बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता असलेल्या समीर रकटे यांच्याकडे नगररचना विभागातील थेट उपअभियंता पदाचा पदभार दिला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत असलेल्या शेख नामक लिपिकाला बांधकाम विभागात बदली देण्यात आली आहे.

NMC
Nashik News : ‘इस्पॅलियर’च्या विद्यार्थ्यांचा वादनातून जागतिक विक्रम; रिसायकल प्लॅस्टिक बॅन्डचे सादरीकरण

याच विभागात प्रशासन विभागाचे माजी उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांनी भगुरे नामक कर्मचाऱ्याची या विभागावर देखरेख करण्यासाठी टेंडर क्लार्क बनविले. भूसंपादन विभागात वादग्रस्त अभियंत्यांच्या बदल्या करताना नगररचना विभागातील वादग्रस्त अभियंत्यांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू आहेत.

एकंदरीत अर्थकारणातून होत असलेल्या बदल्यांची दखल शासन पातळीवरून घेतली जाण्याची दाट शक्यता असून शासनाकडे बदल्यांचा अहवाल सादर करण्याची तयारी शहरातील काही संघटनांनी केली आहे.

पाणीपुरवठा, मलनिसारणकडे पाठ

नगररचना व बांधकाम विभागात अभियंते, कर्मचारी नियुक्तीसाठी प्रयत्न करतात. महापालिकेत एका अभियंत्याकडे नगररचना, बांधकाम या दोन्ही विभागांचे पदभार आहे. परंतु पाणीपुरवठा, मलनिस्सारण या विभागात काम करण्यास अनेक जण अनुत्सुक दिसतात. लक्ष्मी दर्शन देण्यास कमी पडतात. त्यांची या विभागांमध्ये बदली केली जाते. दोन्ही विभाग सेवेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. परंतु अभियंत्यांना मलईदार खात्यात बदलीकडे अधिक रस असल्याने परिणामी या यंत्रणेवर ताण पडतो.

NMC
Nashik Police Morning Walk : नाशिक पोलीस आयुक्तांची ‘गोल्फ’वर पायी रपेट! समस्या मनपाच्या; मांडल्या पोलीस आयुक्तांसमोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.