Nashik News : दोषाचा शोध घेताना वीज कर्मचाऱ्यांची दमछाक; मांजरीमुळे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट

Nashik : आशर इस्टेट येथील विद्युत डीपीमध्ये मोठा आवाज झाला अन्‌ काही मिनिटात महावितरण वीज कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा तेथे दाखल झाला.
MSEB News
MSEB Newsesakal
Updated on

Nashik News : आशर इस्टेट येथील विद्युत डीपीमध्ये मोठा आवाज झाला अन्‌ काही मिनिटात महावितरण वीज कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा तेथे दाखल झाला. कशामुळे झाले, काय झाले याचा शोध घेता घेता वीज कर्मचाऱ्यांची चांगलीच कसरत व दमछाक झाली. विजेचा अनियमित पुरवठ्याबद्दल कायमच नागरिकांचा रोष सहन करणारे महावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांना जेव्हा लक्षात आली की आपल्यामुळे नाही तर पाळीव मांजर ट्रान्सफॉर्मरवर जाऊन बसल्यामुळे स्फोट झाला. (Transformer explosion due to exhaustion of electricity workers while searching for fault )

तेव्हा त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला, मात्र या घटनेत पाळीव मांजराला मात्र जीव गमवावा लागला. शनिवारी (ता. २८) सकाळी साडेअकरा वाजता आशर इस्टेट येथे डीपीमध्ये मोठा आवाज होऊन सदर परिसरातील वीज बंद झाली. आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी घराबाहेर घेऊन काय झाले आहे, हे बघण्यासाठी गर्दी केली. आपल्या परिसरामध्ये वारंवार अशी विजेची समस्या निर्माण होत आहे याबद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. (latest marathi news)

MSEB News
Nashik News : इंदिरानगरला ठिकठिकाणी कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट; साथीचे रोग बळविण्याची शक्यता

उपनगर सबस्टेशनचा वीज कर्मचाऱ्यांचा ताफा काही क्षणात येथे दाखल झाला. नेमके काय झाले याचा शोध घेऊ लागले. मागील आठवड्यातच याच परिसरातील गुरुव्हीला या इमारती त शॉर्टसर्किटमुळे विजेचे उपकरणे बंद पडून लाखांचे नुकसान झाले होते. पुन्हा त्याच परिसरात असा स्फोट झाल्यामुळे महावितरणचे कर्मचारी अधिक तत्परतेने तेथे दाखल झाले. पुन्हा एकदा नागरिकांच्या टीकेचे धनी होणार आहे अशी मनस्वी तयारी केली होती. नागरिक रोष व्यक्त करण्याच्या अगोदरच अत्यंत वेगाने ट्रान्सफॉर्मर तपासणी सुरू केली.

त्याचदरम्यान वीज कर्मचाऱ्यांची चांगलीच कसरत झाली आणि काही वेळानंतर लक्षात आले की पाळीव मांजर डीपीवरील ट्रान्सफॉर्मरवर जाऊन बसले होते. लाइव्ह पार्टशी त्याचा संपर्क झाल्यामुळे ट्रीप झाले आणि मोठा आवाज झाला. मात्र विजेचा धक्का बसून मांजर खाली पडले होते आणि तपासणी मात्र वर सुरू होती. त्यामुळे लवकर लक्षात येत नव्हते. खाली पडलेले मांजर बघितल्यानंतर त्याला विजेचा धक्का बसल्याचे समजले.

MSEB News
Nashik News : एकाच बाजूच्या छाटणीमुळे कोसळतात वृक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()