Nashik E-Bus : ई-बसेस प्रकल्प अडचणीत

E-Bus : पीएम ई-बस योजनेअंतर्गत महापालिकेला मिळणाऱ्या ५० इलेक्ट्रिकल बसेसचे संचलन देखील अडचणीत आले आहे.
E-Bus
E-Busesakal
Updated on

Nashik E-Bus : बांधकामातील टाकाऊ साहित्य विल्हेवाट प्रकल्प सुरू करण्यास विलंब झाल्याने केंद्र सरकारकडून प्राप्त होणारे तीन कोटी १३ लाख रुपयांचे अनुदान रद्द झाले असताना आता पीएम ई-बस योजनेअंतर्गत महापालिकेला मिळणाऱ्या ५० इलेक्ट्रिकल बसेसचे संचलन देखील अडचणीत आले आहे. ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने डेपो व चार्जिंग स्टेशन उभारणीला विरोध केल्याने डेपोचे काम बंद पडले आहे. (50 electric buses provided by municipal corporation has also faced difficulties )

त्यामुळे ऑपरेटर्स निश्चित होऊनही कार्यारंभ आदेश देता येत नाही परिणामी इलेक्ट्रिक बस प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने महापालिकेला टाकाऊ बांधकाम साहित्याची विल्हेवाट करण्यासाठी अनुदान जाहीर केले होते मात्र नियोजित वेळेत प्रकल्प न झाल्याने तीन कोटी १३ लाख रुपयांचे अनुदान केंद्र व राज्य सरकारकडून रद्द करण्यात आले आहे. (latest marathi news)

E-Bus
Jalgaon E Bus : जळगावच्या इ बससेवेला केंद्रांची मंजुरी; आमदारांकडून बस डेपो जागेचे पाहणी

विलंबामुळे महापालिकेचे प्रकल्प धोक्यात येत असताना पुन्हा एक प्रकल्प अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमा अंतर्गत केंद्र सरकारने पीएम ई-बस योजनेतून नाशिक महापालिकेला शंभर बसेस मंजूर केल्या पहिल्या टप्प्यात ५० ई-बसेस खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. नाशिक महापालिकेने जेबीएमइको लाईफ मोबाईलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ऑपरेटर म्हणून नियुक्ती केली.

सिटी लिंक कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बसेस खरेदीला मंजुरी देण्यात आली. मात्र ई बस पुरवठ्यासाठी ऑपरेटर कंपनीला कार्यारंभ आदेश दिले नाही. आडगाव येथील ट्रक टर्मिनसमध्ये इलेक्ट्रिक बस डेपोचे काम सुरू आहे. काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ऑपरेटरला कार्यारंभ आदेश न देण्याची भूमिका सिटी लिंक कंपनीने घेतली आहे. त्यामुळे ई बसेस प्रकल्प देखील अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

E-Bus
Nashik E-Bus : सप्तशृंगगड ते नाशिक प्रवास झाला गारेगार! ई-बससेवेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com