Nashik Fraud Crime: पर्यटकांना चंदीगढला सोडून ट्रॅव्हल एजंट पसार! फसवणुकीचा गुन्हा; स्वखर्चानेच केली कुल्लू मनाली ट्रीप

Fraud Crime News : संपूर्ण ट्रीपचा खर्च पर्यटकांनी स्वत: करीत नाशिक गाठले असून, संशयित ट्रॅव्हल एजंटविरोधात पावणे चार लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा अंबड पोलिसात दाखल करण्यात आला आहे.
Fraud Crime
Fraud Crimeesakal
Updated on

Nashik Fraud Crime : नाशिक तेथून कुल्लू मनाली ट्रीपसाठी घेऊन गेलेल्या ३६ पर्यटकांना चंदीगढ विमानतळावर सोडून संशयित ट्रॅव्हल एजंट पसार झाला. त्यामुळे संपूर्ण ट्रीपचा खर्च पर्यटकांनी स्वत: करीत नाशिक गाठले असून, संशयित ट्रॅव्हल एजंटविरोधात पावणे चार लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा अंबड पोलिसात दाखल करण्यात आला आहे. (fraud crime travel agent abandoned Tourists at Chandigarh)

राजीव मदनलाल चंदा (४०, रा. ओमकार हाईट, इंदिरानगर) असे संशयित ट्रॅव्हल एजंटचे नाव आहे. शुभांगी हेमंत बडगुजर (रा. शकुंतला हाईटस्‌, जनक नगरी, कामठवाडे) यांच्या फिर्यादीनुसार, १२ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान संशयित एजंट राजीव चंदा याने नाशिक ते कुल्लू मनाली व कुल्लू मनाली ते नाशिक अशी चार दिवसांची ट्रीपचे नियोजन केले होते.

यासाठी फिर्यादी शुभांगी यांच्यासह शहर-परिसरातील ३६ पर्यटकांनी नाशिक ते कुल्लु मनाली आणि परत नाशिक अशा ट्रीपसाठी नोंदणी निश्चित केलेली होती. या सहलीसाठी या ३६ पर्यटकांकडून संशयित एजंटने ५ लाख ३३ हजार रुपये घेतले होते. यात विमान प्रवास, हॉटेलचे बुकिंग आणि जेवणाचाही खर्च समाविष्ठ होता.

१२ जानेवारीला संशयित एजंट मुंबई येथून चंदीगढसाठी विमानाने घेऊन गेला. पर्यटकांना चंदीगढ विमानतळावर सोडले आणि तो पसार झाला. त्यानंतर पर्यटकांसाठी निश्चित केलेल्या हॉटेलमध्ये पर्यटक गेले असता, त्याठिकाणी त्यांची बुकिंग करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आले. (latest marathi news)

Fraud Crime
Nashik Fraud Crime : दोघा व्यापाऱ्यांना लाखोंचा गंडा! कांदा व्यापाऱ्यास 15, द्राक्ष व्यापाऱ्यास २१ लाखांना फसविले

त्यामुळे पर्यटकांनी संशयित एजंटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने कोणाचेही फोन कॉल स्वीकारले नाहीत. नंतर संपर्क झाला असता, त्याने ‘तुम्ही बुकिंग करून घ्या, मी तुम्हाला पैसे देतो’ असे पर्यटकांना सांगितले. त्यामुळे पर्यटकांनीच पैसे भरून हॉटेल बुक केले. मनालीत फिरण्यासाठी केलेल्या बसचेही भाडे पर्यटकांनीच भरले.

परतीच्या प्रवासातही संशयित एजंट राजीव चंदा याने पर्यटकाच्या परतीच्या विमान प्रवासाचे तिकिटच काढलेले नव्हते. त्यावरून वाद झाला असता संशयित पसार झाला. त्यानंतर पर्यटकांनी कसेबसे मुंबई व मुंबईवरून नाशिक गाठले.

त्यासाठी या ३६ पर्यटकांना ३ लाख ६५ हजार रुपयांचा खर्च आला. यामुळे मनस्ताप झालेल्या पर्यटकांनी संशयित एजंटकडे खर्च झालेल्या रकमेची मागणी केली आहे. परंतु तो उडवाउडवी करीत असल्याने अखेर पोलिसात तक्रार केली. त्यानुसार अंबड पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fraud Crime
Nashik Fraud Crime : स्क्रॅप प्रकरणी संगईंच्या कंपनीतील दोघे अटकेत; वजनकाट्यातील 3 जण ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.