नाशिक : दिवाळीच्या हंगामात प्रवासी संख्येत झालेल्या वाढीचा गैरफायदा घेत ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून अवास्तव भाडे आकारले जात आहे. सामान्य तिकीट दरांच्या तुलनेत ३० ते ५० टक्क्यांपर्यंत जादा पैसे आकारत प्रवाशांच्या खिशावर डल्ला टाकला जात असल्याचे धक्कादायक वास्तव ‘सकाळ’ च्या पाहणीतून उघडकीस आले. दीपोत्सव साजरा करण्यासाठी चाकरमाने, विद्यार्थ्यांना घराचे वेध लागले आहेत. भाऊबीजेनिमित्त महिला माहेरास रवाना होतील. (Travelers charging passengers unreal fares during festival in city )