नांदगाव : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला अद्यापही नव्या ठिकाणी इमारत उभारण्यासाठी पर्यायी जागा मिळत नसल्याने ऐंशी वर्षे उलटल्यानंतरही अजूनही मोडकळीस आलेल्या ब्रिटिशकालीन इमारतीतच जनावरांचा दवाखाना सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने जुन्या मोडकळीला आलेली इमारत धोकादायक असल्याचा अहवाल दिल्यानंतर. (Nashik News)
व त्याचा निर्लेखित केल्याचा अहवाल पाठविल्यानंतरही पशुसंवर्धन विभागाचा नव्या जागेचा शोध थांबलेला नाही. कृषी विभागाच्या जुन्या बीजगुणन येथील तालुका कृषी कार्यालय नव्या प्रशासकीय संकुलात स्थलांतरित झाले व या मोकळ्या झालेल्या जागेवर अद्ययावत असे सर्व सुविधायुक्त पशू वैद्यकीय इमारत उभी राहण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे.
ब्रिटिश काळात जनावरांचा दवाखाना अस्तित्वात आला. त्याला ऐंशी वर्षे उलटली तेव्हाच्या म्युनिसिपल बोर्डाने १९४४ साली जनावरांसाठी या इमारतीत दवाखाना सुरु केला. पुढे जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यानंतर हा जनावराचा दवाखाना हस्तांतरित झाला. मात्र त्याच जागेवर अजूनही तालुक्यातील पशू वैद्यकीय निदानाचे काम सुरू आहे. या इमारतीची गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्था झाली आहे.
अनेक ठिकाणी कौले फुटली आहेत, छत कधीही कोसळण्यची भीती आहे. अधून मधून या गळक्या छतातून पाणी टपकते, अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. जनावरांच्या औषधोपचारासाठी असलेला औषधांचा साठा बुरशी लागल्याने खराब होत आहे. (latest marathi news)
सध्या दिवसाकाठी पन्नासहून अधिक विविध प्रकारच्या जनावरांवर उपचार केले जातात. दवाखान्याची अवस्था पडक्या गोठ्यासारखी झाली आहे. त्यातच पशुधन संवर्धनासाठी सुविधांची वानवा असूनही तालुक्यात पशू उपचारांसाठी शेतकरी व पशुधन मालक यांना पर्याय नाही.जीर्ण इमारतीच्या डागडुजीचे प्रयत्नही अपुरे पडत आहेत.
जागा हस्तांतराची गरज
आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर छत्तीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. गेल्या महिन्यात हा निधी पशू संवर्धन विभागाकडे सुपूर्द झाला. मात्र निधी उपलब्ध झाला असला तरी नव्या इमारतीच्या उभारणीसाठी कृषी विभागाने त्यांच्याकडे उपलब्ध बीज गुणन केंद्राच्या एकूण जागेपैकी दहा गुंठे जागा पशुसंवर्धन विभागाकडे हस्तांतरित केल्यासच नव्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.