नाशिक रोड : नाशिक-पुणे रोडवर पन्नास वर्षे जुनी असणारे काही झाडे तोडलेली आहेत तर काही झाडे आता तोडण्यात येत आहेत. यामुळे वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त करत तोडलेल्या झाडांचे ऑडिट करा आणि पुन्हा झाडे लावा, अशी मागणी केली आहे. (Nashik Tree cutting started on Pune road Tree lovers upset over removal of 50 year old trees marathi news)latest marathi news)
नाशिक-पुणे महामार्गावरील वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच अशी पन्नास वर्षापेक्षा अधिक जुनी, डेरेदार झाडे रस्ता रुंदीकरणासाठी तोडण्यात येत आहेत. शुक्रवारी (ता.१५) कडुनिंबाचे डेरेदार झाड तोडून यात सुरवात झाली. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत विरोध दर्शविला.
या वृक्षतोडीसाठी महापालिकेने सार्वजनिक पाटबंधारे विभागाला परवानगी दिली आहे. तथापि, तोडलेल्या एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावण्याचे न्यायालयाचे निर्देश असताना त्या नियमाला हरताळ फासल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला आहे.
नाशिक-पुणे रोडच्या दुतर्फा वड व अन्य झाडे मोठ्या संख्येने होती. यातील बहुतांश झाडे काही वर्षांपूर्वीच तोडली. आता राहिलेली झाडेही तोडणार असल्याने नाशिक रोड बोडका होणार आहे. शुक्रवारी सकाळी विजय-ममता थिएटरसमोरील कडुनिंबाचे मोठे व जुने झाड तोडण्यात आले.
या झाडाचे भलेमोठे ओंडके क्रेनच्या सहाय्याने मागे नंबर नसलेल्या डंपरमध्ये तसेच अन्य वाहनांमध्ये भरले. या लाकूड फाट्याचा काहीच हिशेब ठेकेदार व पाटबंधारेच्या प्रतिनिधींनी नागरिकांना दिला नाही. झाडे तोडण्याचा कामामुळे दिवसभर वाहतूक विस्कळित झाली होती. (latest marathi news)
पर्यावरण कार्यकर्त्या अश्विनी भट, वैभव देशमुख यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तोडण्यात येणाऱ्या २५ पैकी नऊ झाडांच्या पुर्नरोपणाची मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तोडलेल्या झाडांच्या बदल्यात नाशिकरोडच्या इंग्रजी शाळेत झाडे लावल्याची माहिती पाटबंधारे अधिकाऱ्यांनी दिली. मात्र या शाळेला बेकायदा वृक्षतोडीबद्दल महापालिकेने नऊ लाखाचा दंड केला आहे.
हायकोर्टात धाव
वाहतुकीस अडथळा येत असल्याच्या सबबीखाली व्दारका ते दत्तमंदिर रोड मार्गावरील अन्य झाडेही तोडणार असल्याने पर्यावरण प्रेमींनी हायकोर्टात धाव घेतली आहे. जुनी व डेरेदार झाडे तोडल्यानंतर त्याचे वजन करून प्रशासनाकडे शुल्क भरणे सक्तीचे असताना महापालिकेचा कर्मचारी येथे उपस्थित नव्हता.
मनपा अधिकाऱ्यांनी प्रतिसाद देण्याचे टाळले. अखेर मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क झाल्यावर तोडलेल्या झाडांचे वजन करून सरकारी तिजोरीत पैसा जमा करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे असल्याची टोलवाटोलवी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.