Nashik Tree Plantation : हरणबारी धरण परिसरात बहरणार वृक्षचळवळ! डोंगर परिसरात दीड लाख वृक्षारोपणाचा संकल्प

Nashik News : वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ १ ऑगस्टला सकाळी अकरा वाजता हरणबारी धरण परिसरात पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
while giving the information about the tree movement construction work in the dam area of ​​Haranbari to the Guardian Minister Dada Bhuse. Prasad Sonawane, office bearer of Mosam Khore Water Conservation Committee.
while giving the information about the tree movement construction work in the dam area of ​​Haranbari to the Guardian Minister Dada Bhuse. Prasad Sonawane, office bearer of Mosam Khore Water Conservation Committee.esakal
Updated on

नामपूर : जल आणि पर्यावरण संवर्धनासाठी सिद्धी फाउंडेशनने पुढाकार घेतला असून, मोसमखोरे जलसंधारण समितीच्या वतीने हरणबारी धरण व डोंगर परिसरात सुमारे दीड लाख वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला आहे. वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ १ ऑगस्टला सकाळी अकरा वाजता हरणबारी धरण परिसरात पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. (Tree movement will bloom in Haranbari Dam area)

बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, द्वारकाधीश कारखान्याचे संचालक सचिन सावंत, उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वृक्षारोपणासाठी वनमहोत्सवांतर्गत सवलतीच्या दरात सव्वा लाख रुपयांचे वृक्ष खरेदी करण्यात आले असून, वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याच्या कामास नुकताच प्रारंभ झाला.

मोसम खोरे जलसंवर्धन समितीच्या वतीने हरणबारी धरणातील गाळ काढण्याच्या अभियानात लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने जमा केलेल्या निधीतून हरणबारी धरणाच्या संपूर्ण किनाऱ्यावर तसेच धरणालगतच्या डोंगरावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे. वनविभागाच्या मदतीने भारतीय प्रजातीची सर्व प्रकारची जंगली झाडे लावण्यात येणार आहेत.

वृक्ष लागवड मुल्हेर येथील नाऱ्या डोंगर, अंतापूर येथील दावल मलिक डोंगर, ताहाराबाद महाविद्यालयाजवळील डोंगर, सिद्धी अकॅडमीजवळील तेल्या डोंगर, ताहाराबाद-सटाणा महामार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात १५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प असून, त्यासाठी खड्डे खोदण्यास सुरुवात झाली आहे.

मोसम खोऱ्यातील नागरिकांनी त्यासाठी लागणारी आर्थिक मदत, वाहन, पोकलेन, जेसीबी, ट्रॅक्टर, डंपर उपलब्ध करून दिले. गाळ उपसा मोहीम संपल्यानंतर पर्यावरण संवर्धनासाठी डॉ. प्रसाद सोनवणे, दिनेश सावळा, विकास बत्तीसे, प्रवीण भामरे, दीपक कांकरिया, सतीश भामरे, गजानन साळवे, राजू कुटे, अनिकेत सोनवणे, हेमंत पवार आदींसह युवकांनी वृक्षारोपण मोहिमेकडे मोर्चा वळविला आहे. (latest marathi news)

while giving the information about the tree movement construction work in the dam area of ​​Haranbari to the Guardian Minister Dada Bhuse. Prasad Sonawane, office bearer of Mosam Khore Water Conservation Committee.
Derivatives Market : ‘डेरिव्हेटिव्ह’साठी ‘सेबी’चे कठोर पाऊल; सात उपायांचा मसुदा

तीन कोटी लिटर पाणीसाठा वाढणार

मोसम खोऱ्याला वरदान ठरलेल्या हरणबारी धरणात गेल्या पन्नास वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर गाळ असल्याने साठवण क्षमता खालावली होती. याबाबत मोसम खोऱ्यातील पर्यावरणप्रेमी तरूणांनी सोशल मीडियावर चर्चा करून पालकमंत्री, अधिकारी, सामाजिक संघटनांच्या पुढाकारातून धरणातील गाळउपसा करण्याच्या सेवाभावी कार्याला मूर्त स्वरूप दिले.

शासनाकडून एक रुपयांचीही आर्थिक मदत न घेता धरणातून मोठ्या प्रमाणात गाळाचा उपसा करण्यात आल्याने सुमारे तीन कोटी लिटर पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. डॉ. प्रसाद सोनवणे यांनी गाळ काढण्याच्या कामासाठी पुढाकार घेवून मोसम खोरे जलसंवर्धन समितीची स्थापना केली.

"धरण परिरारात पन्नास हजार बांबूंसह जांभूळ, चिंच, आंबा, वड, पिंपळ देशी जातींच्या दीड लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. बांबूमुळे धरणात गाळ येण्याचे प्रमाण थांबेल. तसेच, पर्यावरणाच्या दृष्टीने फायदा होईल. निसर्गरम्य वातावरण तयार झाल्यावर पर्यटकांचीसुद्धा गर्दी वाढल्याने परिसरातील गरजू नागरिकांना रोजगाराची संधी निर्माण मिळतील."

- डॉ. प्रसाद सोनवणे, तालुका संचालक, मविप्र

while giving the information about the tree movement construction work in the dam area of ​​Haranbari to the Guardian Minister Dada Bhuse. Prasad Sonawane, office bearer of Mosam Khore Water Conservation Committee.
Medical Insurance : गडकरींनी अर्थमंत्र्यांकडे केली मोठी मागणी, मेडिकल इन्शुरन्स होणार स्वस्त? GST ने बिघडवला खेळ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.