Nashik Police : पोलिसाचे कर्तव्य पार पाडताना अतिरिक्त ताणतणाव अन् कामाच्या वेळांमुळे पोलीसात पिळदार शरीरयष्टी असलेला पोलिस कर्मचारी अपवादानेच पहावयास मिळतो. भरती होताना भलेही शारीरिक चाचणीतून सुदृढता सिद्ध होते, परंतु नंतर ती तशीच न राहता ‘ढेरपोटे’ पोलिसच पहावयास मिळतात. मात्र अलीकडे पोलिसांसाठी घेण्यात आलेल्या बॉडी मास इंडेक्सच्या (बीएमआय) चाचणीतून ५६५ पोलिस शारीरिक सुदृढ निष्पन्न झाले असून, पिळदार शरीरयष्टीसाठी ते स्वत: प्रयत्नशील असल्याचे दिसून आले आहे. (nashik trend towards physical and mental fitness is also increasing in city police marathi news)
पोलिस अधिकारी, अंमलदार, कर्मचाऱ्यांवर नेहमीच बंदोबस्तासह गुन्ह्याचा शोध, गस्ती यासारख्या कामांचा ताणतणाव असतो. या ताणतणावातून अनेकांना नको त्या वयामध्ये असाध्य आजारांना सामोरे जावे लागते. यामागे, त्यांच्यावरील ताणतणाव अन् आरोग्याकडे दुर्लक्ष हेच मुख्य कारण असते. शहर पोलिस दलातील १ हजार २५३ पोलिसांनी बीएमआय चाचणी नुकतीच केली होती. दलात येताना सर्वच पोलिस पिळदार शरीरयष्टी अन् सुदृढ असतात.
मात्र कामाचा अतिरिक्त ताण, वेळेचे नियोजन नसल्याने शारीरिक व मानसिक ताण वाढतो. १२ तास वा त्याहूनही अधिक वेळेचा बंदोबस्त वा कर्तव्य पार पाडावे लागते. याशिवायही कौटुंबिक व नोकरीची जबाबदारी सांभाळताना तारेवर कसरत करावी लागते ती वेगळीच. यामुळे अनेकांना शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा आरोग्याच्या समस्या उद्भवतात. तसेच इतरही आजार जडतात. (latest marathi news)
वाढती सजगता
अलीकडे मात्र पोलिसांमध्ये शारीरिक सुदृढतेसाठी सजगता आली आहे. यामुळे ढेरीवाल्यांची जागी आता पिळदार शरीरयष्टीचे पोलिस दिसू लागले आहेत. कामाची वेळ, जबाबदारी यामध्ये सुसूत्रता आणून ताण कमी करण्याचा प्रयत्नही पोलिस प्रशासन करते आहे. अनेक अधिकारी व अंमलदार जीम, सायकलिंग, ट्रेकिंग, मैदानांवर घाम गाळू लागले आहेत , तर काही योगासनाच्या माध्यमातून मानसिक आरोग्यावर भर देत आहेत. यामुळे स्थूल शरीरयष्टी जाऊन आता पिळदार शरीरयष्टीचे पोलिस नजरेला पडतात.
प्रोत्साहन भत्ता
राज्य शासनाने २००७ पासून पोलिसांची बीएमआय चाचणी करण्यास सुरवात केली आहे. अधिकारी व अंमलदारांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी ३० वर्षांपुढील पोलिसांची बीएमआय चाचणी केली जाते. त्यानुसार, १ हजार २५३ पोलिसांची चाचणी केली असता, त्यात ५६५ पोलिस शारीरिकदृष्ट्या सुदृढ तर, ३४४ पोलिस ढेरपोटे आढळले. सुदृढता व पिळदार शरीरयष्टी असलेल्या पोलिसांना दरमहा २५० रुपये प्रोत्साहन भत्ताही शासनातर्फे दिला जातो.
असा असतो बीएमआय
शरीर वस्तुमान निर्देशांक (बॉडी मास इंडेक्स) हे वयानुसार शरीराचे वजन आणि उंची यांचे गुणोत्तर आहे. वजनाला उंचीच्या वर्गाने भागले असता निर्देशांक समजतो. १८ ते २५ निर्देशांक सामान्य, २५ ते ३० निर्देशांक म्हणजे वाढले वजन तर, ३० च्या पुढील निर्देशांक असणारे म्हणजे ढेरपोटे वा लठ्ठपणा.
''पोलिस दलात काम करताना शारीरिक सुदृढता महत्त्वाची आहे. त्यासाठी नियमित आरोग्य चाचणी घेतली जाते. शारीरिक सुदृढता राखणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जातो. पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना शारीरिक सुदृढतेसाठी प्रोत्साहित केले जात आहे.''- चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, शहर मुख्यालय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.