Nashik News : चौसाळ्यात 20 वर्षानंतर रंगला बोहाडा उत्सव! विधानसभेचे उपसभापती झिरवाळ यांचे रावणाची ताटी घेउन नृत्य

Nashik News : मोठ्या उत्साहात व पारंपारीक पध्दतीने आदिवासींची गौरवशाली लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारा व व निसर्ग शक्तीचे ऋण फेडणारा "बोहाडा" उत्सव झाला.
Bohada Utsav
Bohada Utsav esakal
Updated on

वणी : मुखवटा करणाऱ्यांचे गाव अशी ओळख असलेल्या चौसाळे (ता.दिंडोरी) येथे तब्बल २० वर्षांनंतर मोठ्या उत्साहात व पारंपारीक पध्दतीने आदिवासींची गौरवशाली लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारा व व निसर्ग शक्तीचे ऋण फेडणारा "बोहाडा" उत्सव झाला. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाठ यांनीही त्यात सहभागी होत रावणाची ताटी घेउन पारंपारीक नृत्य करीत लक्ष वेधले. आदिवासी बांधवांचे वैविध्यपूर्ण जीवनसंस्कार, प्रथा, परंपरा व उत्सव आहेत. (Tribal Bohada Utsav after 20 years in Chousala)

आदिम संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही त्यात दृष्टीस पडतात. हजारो वर्षांपूर्वी आदिवासी देवी-देवता, राक्षस, पक्षी, प्राणी यांचे मुखवटे चेहऱ्यावर धारण करून नृत्य करीत होते. त्यातील काही परंपरा आजही प्रचलित असल्याचे दिसून येते. 'बोहाडा' हा त्यातलाच एक उत्सव असून चौसाळे गावात हा उत्सव सन २००४ नंतर म्हणजे २० वर्षानंतर साजरा झाला. कार्यक्रमाला गावातील सर्व लहानथोर तरुण, मित्र मंडळी या सर्वांचा चांगला सहभाग होता.

मुखवटे करणारे गाव

चौसाळे हे बोहाड्यासाठी नाशिक जिल्ह्यात प्रसिद्द गाव मानले जायचे. चौसाळे येथील कै. ढवळू पांडू जोपळे व त्यांचे वडील कै. पांडू जोपळे यांनी शंभर ते सव्वाशे वर्षापासून मुखवटे (सोंग)आणि ताट्या बनवण्याचे काम आणि बोहाडा उत्सवास सुरुवात केली होती. आदिवासी भागात बोहाड्यासाठी लागणारे विविध मुखवटे आदिवासी बांधव चौसाळे येथून घेवून जात.

आजही ही पंरपरा त्यांचा मुलगा दिनकर ढवळू जोपळे तसेच वंसत चिंतामण जोपळे यांनी हे काम पुढे चालू ठेवले आहे. २४ मे २८ मे या कालावधीत पासून दशावतार बोहाडा उत्सव झाला. उत्सवा दरम्यान गावातील लहान थोर स्त्री पुरुष, गुरढोरे या सर्वांना सुख समृद्धी चांगले आरोग्य मिळण्यासाठी गावातील मारुतीच्या मंदिरापासून ते गावाच्या वेशी पर्यंत संबळच्या तालावर मुखवटे घेऊन नाचून परत मंदिरात नाचविण्यात आले. (latest marathi news)

Bohada Utsav
Nashik Water Scarcity : जिल्ह्यात भीषण टंचाई! टॅंकरची संख्या 400, खर्च 63 कोटी

कुटुंब आणि त्यांचे मान

सोहळ्याला पिंगळवाडी, करंजखेड, एकलहरे, मोळविहीर हस्ते, खोरीपाडा, पिंप्रीअंचला येथील लोक रोज उपस्थित होते. गावातीलच पुरुष व तरुणांनी विशिष्ट प्रकारचा पेहराव व मुखवटे घालून पारंपारीक वाद्य असलेल्या वाजंत्री- संबळ च्या निनादात चार दिवस विविध कार्यक्रम झाले. गावातील प्रत्येक कुळांना मान ठरलेला असतो.

प्रामुख्याने जोपळे, तुंगार, डंबाळे, गांगोडे, गावित, थैल, ठाकरे, बागुल आडनावांच्या लोकांना विशिष्ट मानाचे सोंग आणि ताटे असतात. त्याच प्रामुख्याने जोपळे परिवाराला मानाचे सोंग गणपती सारजा, राम लक्ष्मण, रावण रावणाची ताटी, श्रीकृष्ण, मारुती ताटी यांचा मान असतो. तुंगार परिवार कुलदैवत जेजुरीचा खंडोबा त्याचा घोडा टोप नाचवतात.

बागुल परिवाराकडे भक्त पुंडलिक, भीम आणि अर्जुन यांचा मान असतो. तर तर गांगोडे परिवाराकडे हिडींबा त्राटिका यांच्या मान असतो, डंबाळे परिवाराकडे वेताळ, धोटिंग, म्हसोबा हे मानाचे सोंग असतात, ठाकरे परिसराकडे टुगु,तर थैल परीवाराकडे शेंद्र्यासुर,आणि दत्ताची ताटी असते. तर गावित आणि गांगोडे परिवाराकडे होडी असते. शेवटच्या दिवशी महिषासुर आणि देवी यांच्यात घनघोर युद्ध होतं असं दाखवले जातं आणि देवीची पूजा होऊन कार्यक्रमाची सांगता होते.

Bohada Utsav
Nashik News : पंजाबचे राज्यपाल यांची श्री भैरवनाथ महाराज मंदिरात सदिच्छा भेट!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com