Nashik : जिलेटिनच्या स्फोटात आष्टीचे तीन मजूर ठार

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्घटना
विहीर
विहीर sakal
Updated on

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी गावाजवळ विहीर खोदताना जिलेटीनचा स्फोट होऊन तीन मजूर ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यात एक मजूर जखमी झाला आहे. हे सर्व कामगार आष्टी (जि. बीड) तालुक्यातील आहेत. घटनेची हरसूल पोलिसांत नोंद झाली आहे.

लहू जालिंदर महाजन (वय ३९), आबा ऊर्फ पिनू एकनाथ बोराडे (३६), बिभीषण श्यामराव जगताप (४०) अशी मृत मजुरांची नावे आहेत. हिरडी गावात ग्रामपंचायतीच्या विहिरीचे खोदकाम सुरू होते. यासाठी विहिरीत जिलेटीनद्वारे बार उडविण्याचे काम मंगळवारी (ता. १८) रात्री सुरु होते. त्यासाठी तीन ते चार मजूर विहिरीत उतरलेले होते.

रात्री साडेआठच्या सुमारास विहिरीला लावलेल्या जिलेटीनच्या अचानक स्फोट झाला. त्यात तिन्ही मजूर गंभीर जखमी झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्फोट इतका भीषण होता की, दोन कामगार विहिरीतून उंचावर बाहेर फेकले गेले. तिसरा कामगार दगडांखाली दबला. रात्री उशिरा त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हरसूल पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक बोडके व पथकाने पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविले. हरसुल पोलिसात घटनेची नोंद झाली असून तपास सुरू आहे.

रोजगाराच्या शोधात नाशिकला

हाताला काम नसल्याने आष्टी तालुक्यातील लहू जालिंदर महाजन (राळसांगवी), आबा एकनाथ बोराडे (बोरडवाडी), बिभीषण श्यामराव जगताप (धिर्डी) हे धिर्डी येथील नारायण भिताडे यांच्या मालकीच्या पोकलेन यंत्रावर मजुरीसाठी नाशिकला गेले होते. हिरडी (जि. नाशिक) येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना जिलेटीनच्या स्फोटात तीन मजुरांचा मृत्यू झाला. तिघांच्या पार्थिवावर आज रात्री उशिरा शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.