Simhastha Kumbh Mela : त्र्यंबकेश्‍वर कुंभमेळा आराखडा रखडला; अंतिम स्वरूप मिळेना

Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्‍यक कामांचा प्रारूप आराखडा त्र्यंबकेश्‍वर पालिकेकडून अद्याप सादर झालेला नाही.
Kumbh Mela (file photo)
Kumbh Mela (file photo)esakal
Updated on

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्‍यक कामांचा प्रारूप आराखडा त्र्यंबकेश्‍वर पालिकेकडून अद्याप सादर झालेला नाही. नाशिक महापालिकेने ११ हजार ६०० कोटींचा आराखडा सादर केला. मात्र, त्र्यंबकेश्‍वरचा आराखडा रखडल्याने त्याला शासनाकडून मंजुरी केव्हा मिळणार आणि प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार याविषयी साशंकता वाढली आहे. नाशिक व त्र्यंबकेश्‍वरमध्ये २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यानिमित्त नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर पालिका व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लावण्यावर भर दिला जातो. (Trimbakeshwar Kumbh Mela plan stalled )

सिंहस्थाच्या निमित्ताने तसेच त्यानंतरही वर्षभर नाशिक, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी देवी या तीर्थस्थळांवर भाविकांची गर्दी मोठी असते. यामुळे भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दुरुस्तीवर अधिक भर देत अडीच हजार कोटींचा आराखडा तयार केला आहे. यात प्रामुख्याने डहाणू-त्र्यंबकेश्वर-संभाजीनगर रस्ता, नांदगाव-पिंपळगाव अडसरे-टाकेद रस्ता, वाकी-देवळा-टाकेद हर्ष रस्ता, साकूर फाटा-पिंपळगाव निनावी- भरवीर रस्ता, अधरवड-टाकेद बुद्रुक रस्ता, खेड (भैरवनाथ मंदिर) कळसूबाई मंदिर-इंदोरे रस्ता, इंदोरे-लहान कळसूबाई मंदिर रस्ता, कावनई-गोंदे व कावनई-मुकणे रस्ता काँक्रिटीकरण करणे यांसारख्या कामांचा समावेश आहे. (latest marathi news)

Kumbh Mela (file photo)
Simhastha Kumbh Mela : नाशिकमधील 240 किलोमीटर रस्ते टाकणार कात! विभागीय आयुक्तांनी घेतला कामकाजाचा आढावा

वाळविहीर-लोहारवाडी रस्त्याचे काँक्रिटीकरण या कामांचा समावेश आहे. शिवाय कावनई येथील मंदिराचे सुशोभीकरण करणे, इगतपुरीतील कामाख्या देवी मंदिर येथे सभामंडप बांधकाम व सुशोभीकरण करणे यांसारखी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. रस्त्यांच्या कामांमध्ये प्रामुख्याने इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यांमधील ग्रामीण रस्त्यांचा समावेश आहे.

यामुळे भाविकांना त्र्यंबकेश्वर येथे येण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहेत. त्र्यंबकेश्‍वरच्या दृष्टीने ही कामे महत्त्वपूर्ण आहेत, पण मूळ त्र्यंबकेश्‍वर नगर परिषदेच्या हद्दीतील कामांचा प्रारूप आराखडा अद्याप जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे सादर झालेला नाही. त्यामुळे दीर्घकालीन कामांना दिरंगाई होत असल्याने कामे वेळेत पूर्ण कशी होणार, याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

''सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आराखड्यात बदल झाल्याने अंतिम प्रारूप आराखड्याचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत आम्ही आराखडा सादर करणार आहोत.''-श्रेया देवचक्के, मुख्य कार्यकारी अधिकारी, त्र्यंबकेश्‍वर पालिका

Kumbh Mela (file photo)
Simhastha Kumbh Mela : सिंहस्थासाठी परसेवेतील अधिकारी नियुक्तीचा घाट; अधिक्षक व शहर अभियंतापदासाठी हालचाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.