त्र्यंबकेश्वर : सध्या जगाच्या नकाशावर धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून त्र्यंबकेश्वर ख्यातकीर्त आहे. याठिकाणी दर्शनासाठी आणि मन:शांतीसाठी दूरवरून पैसे व वेळ खर्च करीत भक्त येतात. मात्र, व्यवस्थापनाचे परिसरातील अस्वच्छता आणि सुलभ दर्शन व्यवस्थेकडे लक्ष नसल्याने भक्तांवर तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहण्याची वेळ येते.
श्रद्धाळू भाविकांकडून मिळणाऱ्या भरमसाट देणग्यांचा योग्य विनियोग होत नसल्याने मनस्ताप सोबतीला घेऊन माघारी परतणाऱ्या भक्तांना त्र्यंबकेश्वरची देवस्थाने कधी पावतील का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. (Trimbakeshwar devotees suffering due to poor facilities)