SAKAL Exclusive : क्‍लासच्‍या शुल्‍काचा आकडा वाढता वाढे! आर्थिक नियोजन करताना पालकांची तारेवरची कसरत

Nashik News : नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात होत असताना, क्‍लासच्‍या चौकशीसाठी विद्यार्थी, पालक शहरभर फिरत आहेत. पण क्‍लासेसच्‍या शुल्‍काचे आकडे एकताच अनेक पालकांच्‍या तोंडात बोट गेल्‍यावाचून राहात नाही.
Tuition Class
Tuition Classesakal
Updated on

Nashik News : सध्याच्‍या स्‍पर्धेच्‍या युगात शाळा, महाविद्यालयांसमवेत अभ्यासासाठी बहुतांश विद्यार्थी क्‍लासेसचा आधारदेखील घेतात. नुकताच नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात होत असताना, क्‍लासच्‍या चौकशीसाठी विद्यार्थी, पालक शहरभर फिरत आहेत. पण क्‍लासेसच्‍या शुल्‍काचे आकडे एकताच अनेक पालकांच्‍या तोंडात बोट गेल्‍यावाचून राहात नाही. (Tuition Class Fees Increase due to Parents struggle with financial planning)

आर्थिक नियोजन करताना अशा पालकांची तारेवरची कसरत होत असून, शुल्‍कवाढीची झळ त्‍यांना सोसावी लागते आहे. चांगल्‍या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी कटू स्‍पर्धेचा सामना करावा लागतो आहे. त्‍यामुळे पाया भक्‍कम करण्यासाठी अनेक पालक आपल्‍या पाल्‍याला शालेय स्‍तरापासून क्‍लासचा आधार घेतात. तर काहींकडून कनिष्ठ महाविद्यालयीन स्‍तरावर क्‍लास लावण्यावर भर दिला जातो.

कोरोना महामारीदरम्‍यान सर्वच काही ठप्प असताना शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले होते. ऑनलाइन अध्ययनाला मर्यादा असल्‍याने अनेक विद्यार्थ्यांचा पाया कमकुवत राहिला होता. आता परिस्थिती पूर्वपदावर आलेली असताना, खासगी शिकवणीवर अवलंबून असलेल्‍या विद्यार्थ्यांच्‍या संख्येत वाढ झाली आहे.

दुसरीकडे साधारणतः दोन-तीन वर्षांमध्ये सातत्‍याने शिकवण्यांच्‍या शुल्‍कामध्येही वाढ होत राहिली आहे. अगदी काही हजारांपासून लाखो रुपये वार्षिक शुल्‍क घेणारी क्‍लासेस सध्या कार्यरत आहेत. अशात आपल्‍या पाल्‍याला चांगल्‍यात चांगल्‍या शिकवणीमध्ये शिकविण्याच्या आग्रहासाठी पालकांना आर्थिकदृष्टया नियोजनात तारेवरची कसरत करावी लागते आहे. (latest marathi news)

Tuition Class
Nashik Pre-Monsoon News : मॉन्सूनपूर्व पावसाने 6 व्यक्तींचा घेतला बळी! 1 हजार 563 घरांची पडझड

कर्जाचा आधार

लाखात शुल्‍क असलेल्‍या शिकवणीसाठी अनेक पालक कर्ज योजनेचा आधार घेताना दिसतात. खासगी, सरकारी बँकेतून वैयक्‍तिक स्‍तरावर कर्ज घेत आहेत. तर काहींकडून क्‍लासचालकांशी समन्‍वय साधताना हप्त्‍यांमध्ये शुल्‍क अदा करण्याच्‍या योजनेचा लाभ घेत आहेत.

‘होम टीचिंग ला मागणी

अनेक पालकांकडून आपल्‍या पाल्यांसाठी घरी शिक्षक बोलवितांना ‘होम टीचिंग’ची मागणी करत असतात. शालेय स्‍तरावर अशा स्वरूपाच्या शिकवणीचे प्रमाण अधिक आहे. अभ्यासात झालेले नुकसान भरून काढणे, अभ्यासाची उजळणी करणे यासह अनेक कारणांनी होम टीचिंगचा आग्रह पालक धरत असतात. साधारणतः ८ ते १२ हजार रुपये महिना इतके शुल्‍क यासाठी शिक्षकांकडून आकारले जाते आहे.

म्‍हणून शुल्‍क वाढविणे अपरिहार्य

क्‍लासेसच्‍या संचालकांच्‍या म्‍हणण्यानुसार, विविध कारणांनी शुल्‍क वाढविणे अपरिहार्य होते. पालक सजग झाले असून, प्रत्‍येक विषयाला वेगळा शिक्षक असावा, अशी त्‍यांची अपेक्षा असते. त्‍यामुळे शिक्षकांची तरतूद करावी लागते. बहुतांश क्‍लासेसमध्ये स्‍मार्ट बोर्ड व इतर आधुनिक तंत्रज्ञान उपलब्‍ध असते.

Tuition Class
Nashik News : एअरलाईन्सचा गलथानपणा! विमान प्रवाशांना घेऊन हैदराबादला अन लगेज् नाशिकमध्येच

छापील नोट्स दिल्‍या असून, छपाईच्‍या किमतींमध्ये वाढ झालेली आहे. मोठ्या क्‍लासेसला १८ टक्‍के जीएसटी लागू असून, त्‍यांना तो विद्यार्थ्यांकडूनच वसुल करावा लागतो. अशी शुल्‍कवाढीची विविध कारणे असल्‍याचे सांगण्यात आले.

"अनेक क्‍लास आजही भाडेतत्त्वावरील जागेत चालविले जात असल्‍याने, त्‍याचा आर्थिक बोझा येतो. शासनाच्‍या नियमानुसार वर्ग खोलीसह इतर विविध पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान क्‍लासमध्ये उपलब्‍ध असते. वीस लाखांपेक्षा अधिक उत्‍पन्न असलेल्‍या क्‍लासेसला १८ टक्‍के जीएसटी लागू आहे. अशा कारणांनी शुल्‍कवाढीला पर्याय नसतो. परंतु पालकांच्‍या आर्थिक कुवतीनुसार शिकवणीचे भरपूर पर्याय उपलब्‍ध आहेत." - जयंत मुळे, जिल्‍हाध्यक्ष, कोचिंग क्‍लासेस संचालक संघटना.

Tuition Class
Nashik Onion News : कांदा पुन्हा रडवणार महिन्यात भाव दुप्पट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.