पिंपळगांव बसवंत : मिनी दुबई अन् द्राक्षनगरी अशी ओळख असलेल्या पिंपळगांव बसवंत शहरात गणेशोत्सव ते दिवाळीपर्यतच्या दीड महिन्यात अंदाजे दीडशे कोटी रूपयांची उलाढाल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यात सराफ, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, बांधकाम, मिठाई, रंग व काप बाजाराचा मोठा सहभाग राहील.
कांदा, टोमॅटोच्या दरातील तेजी कायम राहिल्यास हे अर्थकारण अजून एक पाऊल पुढे जाऊ शकेल. सणासुदीच्या तोंडावर शासनाने ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजना आणली. त्याअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा होत असल्याने या वर्षी सणासुदीच्या काळात खरेदीला उधाण येण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तविली जात आहे. (turnover of 150 crore rupees will done till Diwali)