Nashik News : घरात कासव पाळल्यास तुरुंगवारी! भारतात 29 पैकी 28 प्रजाती प्रतिबंधक तर 25 राखीव क्षेत्रात

Nashik : प्राणी घरामध्ये पाळणे ही अनेकांची आवडती बाब आहे. कुठल्या ना कुठल्या कारणाने आपण घरामध्ये प्राणी ठेवतो.
jail
jail esakal
Updated on

निखिल रोकडे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : प्राणी घरामध्ये पाळणे ही अनेकांची आवडती बाब आहे. कुठल्या ना कुठल्या कारणाने आपण घरामध्ये प्राणी ठेवतो. मात्र ते पाळणेसुद्धा कायदेशीर आहे की नाही हे आपण तपासून घेण्याची गरज आहे. अलीकडच्या काळात घरामध्ये कासव पाळण्याची आवड अनेकांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र कासवाच्या काही प्रजाती घरामध्ये पाळणे, बंदिस्त वा डांबून ठेवणे बेकायदा आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होऊन शिक्षाही होऊ शकते. (turtle species are illegal to keep indoors in captivity or in cages)

म्हणूनच आपण कोणत्या प्राण्याची कोणती प्रजाती पाळत आहोत याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. कायद्यानुसार तीन ते सात वर्षांची शिक्षा व एक लाख रुपयांपर्यंतचा दंडही होऊ शकतो. भारतात कासवाच्या २९ पैकी २८ प्रजाती प्रतिबंधक क्षेत्रात येतात. यापैकी २५ प्रजाती या राखीव क्षेत्रात आहेत. त्यांना कायद्याचं सर्वाधिक संरक्षण देण्यात आलंय. त्यामुळे कोणतंही कासव पाळणं आपल्याला अडचणीत आणू शकतं. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १८७२ च्या अनुसूची १ ते अनुसूची ४ मध्ये वन्यजीव प्राण्यांची यादी दिली आहे, जी कायद्यानुसार सरकारची मालमत्ता आहे.

त्यांना पाळीव प्राणी म्हणून ठेवता येत नाही. भारतीय वन्यजीव संस्थानकडून कासवांच्या काही प्रजातींविषयीची माहिती दिली आहेत. या प्रजाती कोणताही व्यक्ती स्वत:जवळ कायद्याने बाळगू शकत नाहीत. बहुतांश कासव प्रजाती या इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (आययुसीएन) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या लाल यादीत तसेच चिंताजनक, धोकादायक स्थितीत अशा वर्गवारीत समाविष्ट आहेत. (latest marathi news)

jail
Nashik News : मराठीला अभिजात दर्जा मिळण्याच्या अपेक्षा उंचावल्या; संमेलनाच्या निमित्ताने मागणीला मिळेल बळकटी

कासवांच्या प्रजाती भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार संरक्षित आहेत. त्यामुळे कासव कुठल्याही उद्देशाने पकडणे, विकणे किंवा विकत घेणे आणि पाळणे बेकायदा ठरते. वाढते जलप्रदूषण आणि कासवांचा नैसर्गिक अधिवास संपुष्टात येत असल्यामुळे दिवसेंदिवस कासवांची संख्या कमी होत आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पृथ्वीवरील प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे.

''वन्यजीव कायद्याअंतर्गत कासवांसारख्या अशा अनेक प्राण्यांच्या प्रजाती आहेत की ज्या घरी पाळणे प्रतिबंधित आहे. विशेष करून ज्या प्रजाती नष्ट होत आहेत त्यांचा समावेश या यादीत आहे. कुठल्याही ठिकाणी अशा प्रकारचे प्राणी बंदिस्त करून ठेवलेले आढळल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.''- उमेश वावरे, उपवनसंरक्षक (पूर्व विभाग)

jail
Nashik News : पुराची ऐतिहासिक नोंद असलेल्या पायऱ्या जीर्ण; पुरातत्त्व विभागाकडून व्हावे जतन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.