Nashik Hajj Yatra Applications : हज यात्रेसाठी जिल्ह्यातून बाराशे अर्ज! शहरातून 400 तर राज्यातून 23 हजार भाविकांची नोंदणी

Latest Nashik News : २०२५ च्या हज यात्रेसाठी देशभरातून १ लाख ४० हजार तर राज्यातून २३ हजार अर्ज मुस्लिम भाविकांनी दाखल केले आहे.
Hajj yatra
Hajj yatraesakal
Updated on

जुने नाशिक : हज यात्रेसाठी नाशिक शहर, मालेगाव शहर आणि जिल्ह्याच्या अन्य भागातून सुमारे बाराशे अर्ज हज कमिटीकडे सादर झाले आहे. यात नाशिक शहरातून ४०० अर्ज आहे. २०२५ च्या हज यात्रेसाठी देशभरातून १ लाख ४० हजार तर राज्यातून २३ हजार अर्ज मुस्लिम भाविकांनी दाखल केले आहे. (Twelve hundred applications from district for Hajj Yatra)

हज कमिटीतर्फे २०२५ वर्षासाठी हज यात्रेस इच्छुक असलेल्याकडून अर्ज मागविण्यात आले होते. यात्रेस जाण्यासाठी इच्छुक असलेल्या भाविकांना अर्ज करण्यासाठी १३ ऑगस्टपासून सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. दोन वेळेस मुदत वाढवून देण्यात आली होती. ३० सप्टेंबर शेवटची तारीख होती. सुमारे दोन महिन्यात देशभरातून सुमारे १ लाख ४० हजार भाविकांनी अर्ज दाखल केले.

यंदा देशासाठी १ लाख २२ हजार भाविकांचा कोटा देण्यात आला आहे. राज्यातील २३ हजार तर शहरातील ४०० भाविकांचा त्यात समावेश आहे. मालेगाव तसेच जिल्ह्याच्या अन्य भागातून सुमारे बाराशे अर्ज दाखल झाले आहे. हज यात्रेसाठीचा कोटा कमी आणि अर्ज भरलेले भाविक अधिक असल्याने ऑनलाइन लकी ड्रॉ मार्फत भाविकांची निवड करण्यात येणार आहे. (latest marathi news)

Hajj yatra
Mukesh Ambani: मुकेश अंबानी बॉलीवूडवरही करणार राज्य; करण जोहरची कंपनी घेणार विकत, काय आहे पुढचा प्लॅन?

एक वर्षाच्या मुलापासून तर ७५ वर्षाच्या वृद्धापर्यंत भाविकांचे अर्ज दाखल करण्यात आले आहे. ६५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या भाविक आणि त्यांची देखभाल करणाऱ्या एक सहकारी यांचा आरक्षित कोट्यातून यात्रेसाठी जाता येणार आहे. ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या महिलांना स्वतंत्ररीत्या हज यात्रेला जाता येणार आहे. यापूर्वी महिलांना एकटे जाण्यास परवानगी नव्हती.

"हज यात्रेचे अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. यंदा अर्ज करणाऱ्या भाविकांना दोन वेळेस मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतअंती १ लाख ४० हजार भाविकांनी हज यात्रेसाठी अर्ज दाखल केले आहे."- हमीद खान खादीमूल हुजाज, हज कमिटी सदस्य

Hajj yatra
Nashik Parking Problem : वाहने बेसुमार अन्‌ पार्किंगची मारामार! रस्त्यावर धावतात 12 लाख दुचाकी अन 3 लाख चारचाकी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.