UPSC Exam : ‘यूपीएससी’ला पंचवीसशे विद्यार्थ्यांची दांडी! नाशिकमध्ये 17 केंद्रांवर परीक्षा

Nashik News : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)तर्फे रविवारी (ता. १६) शहरातील १७ केंद्रांवर नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ चे आयोजन केले होते.
UPSC Exam
UPSC Exam esakal
Updated on

Nashik News : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)तर्फे रविवारी (ता. १६) शहरातील १७ केंद्रांवर नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ चे आयोजन केले होते. दोन सत्रांमध्ये झालेल्‍या या परीक्षेत सिसॅटच्‍या पेपर क्रमांक दोनने उमेदवारांना घाम फोडला. दरम्‍यान, परीक्षेला सहा हजार ३३६ पैकी तीन हजार ७८५ उमेदवारांनी उपस्‍थिती नोंदविली; तर दोन हजार ५५१ उमेदवार गैरहजर राहिले. (Twenty five hundred students absent in UPSC Exam)

या परीक्षेच्‍या आधारे नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची पात्रता ठरणार आहे. ‘यूपीएससी’तर्फे जून‍च्‍या पहिल्‍या आठवड्यात नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ चे ई-प्रवेशपत्र ऑनलाइन माध्यमातून उपलब्‍ध करून देण्यात आले होते. या प्रवेशपत्रांवर विद्यार्थ्यांच्‍या परीक्षा केंद्राचा तपशील उपलब्‍ध केला होता. नियोजित वेळापत्रकानुसार रविवारी ही परीक्षा देशभरातील परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.

नाशिकमध्ये १७ परीक्षा केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षेसाठी नाशिक केंद्रावर सहा हजार ३३६ परीक्षार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी दोन हजार ५५१ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. दरम्‍यान, दोन सत्रांमध्ये आयोजित या परीक्षेतील पेपर क्रमांक एक सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत पार पडला; तर पेपर क्रमांक दोनचे आयोजन दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच या वेळेत केले होते.

सामान्‍य ज्ञानावर आधारित पहिल्‍या पेपरची काठीण्य पातळी सामान्‍य असल्‍याचे परीक्षार्थींनी सांगितले; तर पेपर क्रमांक दोनची काठीण्य पातळी अधिक राहिल्‍याची प्रतिक्रिया अनेक परीक्षार्थींनी दिली. या परीक्षेसाठी ‘सिटीलिंक’तर्फे जादा बसगाड्या उपलब्‍ध करून देण्यात आल्‍या होत्‍या. त्‍याचा फायदा उमेदवारांना झाला. (latest marathi news)

UPSC Exam
Nashik Police Station : शहरातील वर्दळीतल्या ‘पोलिस चौक्या’ नावालाच! बंद चौक्यामुळे तक्रारदारांची गैरसोय

४० टक्‍के परीक्षार्थींची गैरहजेरी

दरम्‍यान, नागरी सेवा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी उमेदवारांना मर्यादित प्रयत्‍न उपलब्‍ध असतात. व वयोमर्यादेचेही पालन करावे लागते. त्‍यामुळे परीक्षेचा प्रत्‍येक प्रयत्‍न त्‍यांच्‍यासाठी महत्त्वाचा असतो. असे असताना रविवारी झालेल्‍या परीक्षेत तब्‍बल ४० टक्‍के उमेदवार गैरहजर राहिल्‍याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. गैरहजेरी वाढण्याच्‍या कारणांबाबत उमेदवारांसह प्रशासकीय यंत्रणेतही चर्चा सुरू असल्‍याचे पाहायला मिळाले.

परीक्षेची क्षणचित्रे...

- पेपरच्या वेळेच्या अर्धा तास आधी उमेदवारांची उपस्‍थिती होती सक्‍तीची

- साधे घड्याळ वगळता इतर गॅझेटला परीक्षा केंद्रात होती मनाई

- सर्व केंद्रांवर जॅमरच्‍या सहाय्याने संपर्क यंत्रणा ठेवली ठप्प

- प्रशासकीय यंत्रणा, पोलिस केंद्र परिसरात तैनात

- वर्गखोलीत प्रवेशापूर्वी यंत्रणेकडून उमेदवारांची कसून तपासणी

- निर्धारित वेळेत उत्तरे लिहिताना परीक्षार्थींची लागली कसोटी

परीक्षेच्या उपस्‍थितीची अशी राहिली स्‍थिती-

सकाळ सत्र ः

उपस्‍थित परीक्षार्थी- ३,७९६

गैरहजर परीक्षार्थी- २,५४०

--------------

दुपार सत्र ः

उपस्‍थित परीक्षार्थी- ३,७८५

गैरहजर परीक्षार्थी- २,५५१

UPSC Exam
Nashik Water Shortage : जिल्ह्यातील 7 धरणे कोरडीठाक! 31 जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे उद्दिष्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.