Nashik News : ‘काश्‍यपी’मधून अडीचशे क्यूसेस पाण्याचा विसर्ग

Nashik News : गंगापूर धरणातील जलसाठा कमी होत असल्याने काश्‍यपी धरणातील शिल्लक पाणी गंगापूर धरणात सोडण्याची तयारी जलसंपदा विभागाने केली.
Kashyapi Dam
Kashyapi Damesakal
Updated on

Nashik News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अल्प पाणीसाठा असल्याने काश्‍यपी धरणातून पाणी सोडण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर जलसंपदा विभागाने पाण्याचा विसर्ग बंद केला होता. परंतु शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर गुरुवार (ता.२७) पासून पुन्हा अडीचशे क्यूसेस वेगाने गंगापूर धरणासाठी पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. (Two and a half hundred cusecs water discharge from Kashyapi Dam)

धरणातून ३५४ दशलक्ष पाणी सोडले जाणार आहे. पाणी सोडताना पुन्हा अडचण येऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. गंगापूर धरणातील जलसाठा कमी होत असल्याने काश्‍यपी धरणातील शिल्लक पाणी गंगापूर धरणात सोडण्याची तयारी जलसंपदा विभागाने केली.

मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे जलसंपदा विभागाने पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती. त्याअनुषंगाने २४ जूनला जलसंपदा विभागाने पोलिस बंदोबस्तामध्ये पाचशे क्यूसेस वेगाने पाणी सोडण्यास सुरवात केली. (latest marathi news)

Kashyapi Dam
Nashik News : ब्रँडेड उत्पादकांकडून कीटकनाशकांचा वापर नाही; महाराष्ट्र मसाला उद्योग संघटनेचा दावा

त्यामुळे नाशिककरांवरील जल संकट तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलले गेले असे मानले गेले. मात्र मंगळवारी (ता. २५) पुन्हा शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर जलसंपदा विभागाने पाण्याचा विसर्ग बंद केला.

काश्‍यपी धरणावर झालेल्या आंदोलनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. २८) सकाळी दहा वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तोपर्यंत अडीचशे क्यूसेस वेगाने काश्‍यपी धरणातून पाणी सोडले जात आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता सोनल शहाणे यांनी दिली.

Kashyapi Dam
Nashik Assembly Election : विधानसभेच्या निवडणुकीत बूथची संख्या वाढणार; पारंपरिक केंद्रही ठरणार कालबाह्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.