Nashik Crime: परजिल्ह्यातील दोघे अट्टल चैनस्नॅचर्स अखेर जेरबंद! 4 गुन्ह्याची उकल; गुन्हेशाखेच्या युनिट दोनची कामगिरी

Crime News : संशयितांच्या अटकेमुळे चार जबरी चोरीच्या गुन्ह्याची उकल होऊन त्यांच्याकडून कारसह चोरीचे सोने असे ५ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
Two unyielding gold chain thieves with the issue. A team from Unit Two of the City Crime Branch along with
Two unyielding gold chain thieves with the issue. A team from Unit Two of the City Crime Branch along withesakal
Updated on

Nashik Crime : परजिल्ह्यातून नाशिकमध्ये येऊन पादचारी महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पोबारा करणाऱ्या दोघांच्या मुसक्या अखेर पोलिसांनी आवळल्या आहेत. संशयितांच्या अटकेमुळे चार जबरी चोरीच्या गुन्ह्याची उकल होऊन त्यांच्याकडून कारसह चोरीचे सोने असे ५ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने बजावली आहे. (Nashik Two chain snatchers in district jailed)

नवनाथ विठ्ठल शिंदे (१९, रा. गंगाखेड, जि. परभणी), अजय विष्णू कांबळे (१९, रा. चांगमारी, ता. खांबगाव, जि. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या दोघा सोनसाखळी चोरट्यांची नावे आहेत. या दोघांनी २० एप्रिल रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास चेतनानगरमध्ये बंगल्या बाहेर उभ्या असलेल्या ८० वर्षीय रोहिणी रमाकांत जोशी यांच्या गळ्यातील ५४ हजारांची सोन्याची पोत बळजबरीने खेचून नेली होती. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता.

शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना, अंमलदार विशाल कुंवर, समाधान वाजे यांना दोन सोनसाखळी चोरटे नाशिकरोडच्या गोसावीवाडी परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, सहायक उपनिरीक्षक विवेक पाठक, मनोहर शिंदे, स्वप्निल जुंद्रे, परमेश्वर दराडे, संजय सानप, विशाल कुवर, समाधान वाजे, महेश खांडबहाले, तेजस मते, भारती देवकर, लीला अडकमोल, जितेंद्र वजीरे यांच्या पथकाने गोसावीवाडीत सापळा रचून दोघांना जेरबंद केले. (latest marathi news)

Two unyielding gold chain thieves with the issue. A team from Unit Two of the City Crime Branch along with
Yavatmal Crime : उमरखेड येथील युवकाचा मृत्यू संशयास्पद;अनाथ दत्ताच्या मारेकऱ्याला गजाआड करण्याची मागणी

चौकशीमध्ये संशयितांनी इंदिरानगर हद्दीतील तीन आणि आडगाव हद्दीतील एक असे चार जबरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. यातील एक गुन्हा गेल्या महिन्यात तर उर्वरित तीन गुन्हे हे २०२३ मधील आहेत. संशयितांकडून ५ लाख १६ हजार २३० रुपयांचे सोन्याचे गट्टू व ६० हजारांची स्पोर्टस्‌ दुचाकी असा ५ लाख ७६ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांकडून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

Two unyielding gold chain thieves with the issue. A team from Unit Two of the City Crime Branch along with
Akola Crime : चौहट्टाचा गुटखा किंग गजाआड ; ७ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त,दहीहंडा पोलिसांची धडक कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.