Nashik Teachers Constituency : शिक्षक लोकशाही आघाडीत नाशिक विभागात फूट

Nashik News : शिक्षक लोकशाही आघाडी अर्थात, ‘टीडीएफ’चे नाशिक विभागात दोन गट पडले आहेत.
Teachers Democratic Alliance
Teachers Democratic Allianceesakal
Updated on

Nashik News : शिक्षक लोकशाही आघाडी अर्थात, ‘टीडीएफ’चे नाशिक विभागात दोन गट पडले आहेत. एका गटाने नगरचे निवृत्त प्राध्यापक भाऊसाहेब कचरे, तर दुसऱ्या गटाने मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक संदीप गुळवे यांना उमेदवारी घोषित केली. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या ५४ तालुक्यांच्या आणि पाच जिल्ह्यांचा नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ आहे. (two factions in Teachers Democratic Alliance section marathi news shm99

शिक्षक लोकशाही आघाडी ही शिक्षण क्षेत्रातली सर्वांत जुनी संघटना आहे. तब्बल पाचवेळा शिक्षक मतदारसंघात ‘टीडीएफ’चा उमेदवार निवडून आला आहे. सध्या या संघटनेतील दोन गटांमुळे दोन उमेदवार रिंगणात येणार असून, मतविभागणीचा फायदा नक्की कोणाला होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, निफाड तालुक्यात पिंपळगाव येथे झालेल्या सभेवेळी शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे, रवींद्र मोरे, बाळासाहेब सूर्यवंशी आणि काही शिक्षक नेत्यांनी ‘मविप्र’चे संचालक संदीप गुळवे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. पुण्याला झालेल्या ‘पीडीएफ’च्या नऊ निवड समितीतील बैठकीत अहमदनगरच्या प्रा. भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

इच्छुकांची भाऊगर्दी

महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने नगरचे प्रा. भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर नाशिकचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. धुळे-शिरपूर येथील निशांत रंधे यांनी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असून, ‘मविप्र’चे संचालक संदीप गुळवे यांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. (latest marathi news)

Teachers Democratic Alliance
Nashik Police Promotion : सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उपनिरीक्षकपदी बढती! सुखद धक्का; शहर आयुक्तालयातील 5 जणांचा समावेश

येवल्यातून शिक्षक भारतीचे अर्जुन कोकाटे यांनी उमेदवारी करण्याचे निश्चित केले आहे. विजयकुमार दहिते (धुळे), एन. डी. नांद्रे व शुभांगी पाटील (धुळे) यांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

"शिक्षक आमदार हा शिक्षकच असावा, असा आमचा आग्रह होता म्हणून गुणांकन पद्धतीने मुलाखती घेऊन आम्ही भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अध्यापन करणारा शिक्षकच शिक्षक बांधवांचे प्रश्न सोडवू शकतो." - नानासाहेब बोरस्ते, माजी शिक्षक आमदार

"भाऊसाहेब कचरे यांनी अनेकवेळा ‘टीडीएफ’च्या विरोधात उमेदवारी केली आहे. मतांची विभागणी होण्यासाठी त्यांना ही उमेदवारी देऊ केली आहे. ही उमेदवारी देताना आम्हाला विचारात घेतले नाही. म्हणून नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांनी एकमताने गुळवे यांना उमेदवारी देऊ केली आहे." - शिवाजीराव निरगुडे, शिक्षक नेते

Teachers Democratic Alliance
Nashik Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीकडून स्ट्रॉग रूममध्ये प्रतिनिधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.