Nashik Onion Rain Crisis : लाल कांद्याच्या अडीचशे हेक्टरला फटका! मालेगाव तालुक्यात परतीच्या पावसामुळे हाहाकार

Latest Heavy Rain News : मालेगाव तालुक्यात साधारणत: २०० ते २५० हेक्टर कांद्याचे अतिपावसामुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यात ७ हजार २७३ हेक्टरवर खरीप तर ६ हजार २० हेक्टरवर लेट खरीप कांदा लागवड झाली आहे.
Accumulated rainwater in Sanjay Shirole's Lal Kanda field in Talwade.
Accumulated rainwater in Sanjay Shirole's Lal Kanda field in Talwade.esakal
Updated on

विनोद चंदन : सकाळ वृत्तसेवा

मालेगाव कॅम्प : तालुक्यातील मुसळधारेने लाल कांद्यासह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसात लाल कांदा शेतातच भिजला. उशिरा लागवड केलेल्या कांद्याच्या वाफ्यांमध्ये पाणी तुंबल्याने रोपे जमीनदोस्त झाली आहेत. कांदा पीक वाचविण्यासाठी शेतातून पाणी काढण्यासाठी बळीराजाला रात्रीच वाफे फोडण्याची कसरत करावी लागली.

मालेगाव तालुक्यात साधारणत: २०० ते २५० हेक्टर कांद्याचे अतिपावसामुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यात ७ हजार २७३ हेक्टरवर खरीप तर ६ हजार २० हेक्टरवर लेट खरीप कांदा लागवड झाली आहे. एकूण १३ हजार २९३ हेक्टर कांद्याचे क्षेत्र आहे. (Havoc due to return rains in Malegaon taluka)

मुसळधारेने कांदा, मका, टोमॅटो, मिरची, वांगे आदी पिकांचेही नुकसान झाले. पावसाने कांदा रोपही वाहून गेले तर सातत्याच्या पावसामुळे काही ठिकाणी बियाणे उगवलेच नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यंदा अडीच हजार रुपये किलोने बियाणे विकत घेऊन शेतकरी कांदा रोपे व पीक जगविण्याची धडपड करीत आहेत.

अति पावसामुळे लाल कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. वाया गेलेल्या पिकाचे दु:ख बाजूला सारून काही शेतकरी पुन्हा लेट खरीप कांदा लागवडीसाठी बियाणे व रोपांची शोधाशोध करीत आहेत. शासनाने नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. (latest marathi news)

Accumulated rainwater in Sanjay Shirole's Lal Kanda field in Talwade.
Nashik Heavy Rain: द्राक्ष, सोयाबीन मका गेला पाण्यात! परतीच्या पावसाच्या तडाख्याने खरिपाच्या उत्पन्नावर पाणी, द्राक्षही संकटात

लाल कांदा लागवड एकरी खर्च

शेत तयार करणे -२५००, बियाणे - ७००० रुपये, लागवड करणे -८०००, निंदणी - २५००, खत, खाद्य-४०००, औषधे फवारणी २५००, कांदा काढणी ७०००. एकरी लागवड खर्च -३३ हजार ५०० रुपये.

"अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे केले जात आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी गावचे तलाठी व कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा. परतीच्या पावसामुळे कांदा पिकामध्ये जांभळा करपा किंवा पीळ रोग येण्याची शक्यता असून व्यवस्थापनासाठी बुरशीनाशकाच्या आलटून पालटून फवारण्या कराव्यात."

- भगवान गोर्डे, तालुका कृषी अधिकारी, मालेगाव

"परतीच्या जोरदार पावसाने लाल कांद्यात पाणी साचून कांदा खराब झाला. कांदा जगवण्यासाठी मेहनत व खर्च वाया गेला. शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. शासनाने शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई द्यावी."- संजय शिरोळे, शेतकरी तळवाडे

Accumulated rainwater in Sanjay Shirole's Lal Kanda field in Talwade.
Nashik Heavy Rain: निफाडच्या उत्तरपट्यात पावसाचा रुद्रावतार! उगावला 30 कुटुंबाच्या घरात पाणी, शिवडीला 2 हजार कोंबड्यांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.