Nashik News: मैत्रीसाठी दोघी अल्पवयीन रोकडसह दागिने घेत घराबाहेर! पोलिसांच्या सतर्कतेने सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

Nashik News : कुटुंबीय दोघी मैत्रिणींना एकमेकांना भेटू देत नाहीत म्हणून दोघींनी एक लाखाची रोख रक्कम आणि तीस तोळे सोने घेऊन नाशिक गाठले.
Police officers and staff while giving Panchnama of the gold ornaments and cash found in the bag to the concerned
Police officers and staff while giving Panchnama of the gold ornaments and cash found in the bag to the concernedesakal
Updated on

जुने नाशिक : ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे’ शोले चित्रपटातील या गीतास साजेसे काम दोन अल्पवयीन मुलींनी केले. कुटुंबीय दोघी मैत्रिणींना एकमेकांना भेटू देत नाहीत म्हणून दोघींनी एक लाखाची रोख रक्कम आणि तीस तोळे सोने घेऊन नाशिक गाठले. भद्रकाली पोलिसांच्या सतर्कतेने दोघी मैत्रिणींसह लाखोंचा ऐवज सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. (Nashik Two minors friends left home with jewelery with cash news)

शहरास लागून असलेल्या एका गावातून सहावीत शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन मुली एकमेकांच्या मैत्रिणी आहेत. दोघींचे कुटुंबीय त्यांना एकमेकांना भेटू नका, सोबत राहू नका, असे वारंवार सांगत. याचा राग आल्याने दोघी मैत्रिणींनी सोबत घर सोडण्याचा निर्णय घेतला.

रविवारी (ता.२४) मैत्रिणीच्या घरी जाऊन येते, असे सांगून दोघी घराबाहेर पडल्या. उशीर झाला तरी परतल्या नाही यामुळे दोघींच्या कुटुंबीयांनी एकमेकांची चौकशी केली असता दोघीही घरात नसल्याचे आढळले. संबंधित गावाच्या पोलिस ठाण्यास माहिती दिली. पोलिसांनी दोघींच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. एकीचा फोन बंद आला तर दुसरी फोन उचलत नसल्याचे लक्षात आले.

दोघी नाशिक द्वारका भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एकाने शहरातील मुख्यालयात कार्यरत पोलिस मित्र स्वप्नील जाधव यास माहिती दिली. योगायोगाने त्याची नियुक्ती द्वारका भागात होती. फोन सुरू असताना त्याची दोघींवर नजर पडली अन दोघींना ताब्यात घेतले. भद्रकाली पोलिसांच्या स्वाधीन केले.

मुलींनी पोलिसांच्या भीतीपोटी त्यांच्याकडे असलेल्या दोन्ही बॅग द्वारका कावेरी हॉटेल परिसरात फेकून दिल्या. भद्रकाली पोलिसांनी दोघींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत दोघींना त्यांच्या स्वाधीन केले. रात्री गस्त करणाऱ्या पोलिसांना द्वारका परिसरात दोन बॅगा बेवारस स्थितीत आढळून आल्या. त्यांनी पोलिस ठाण्यात बॅगा नेत तपासणी केली.

बागेमध्ये एक लाखाची रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने आढळले. दोघी मुलींपैकी एका मुलीच्या आईचे आधार कार्ड मिळून आले. दोन्ही बॅग त्याच मुलींच्या असल्याची खात्री झाली. सोमवारी (ता. २५) सकाळी पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत माहिती दिली. (latest marathi news)

Police officers and staff while giving Panchnama of the gold ornaments and cash found in the bag to the concerned
Nashik Humanity News: भीषण दुष्काळातही वाहतोय माणुसकीचा झरा! खामखेड्याच्या शेतकऱ्याकडून 300 जनावरांसाठी पाण्याची सुविधा

पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या कुटुंबीयांनी भद्रकाली पोलिसांची भेट घेतली. त्यांच्यासमोर कायदेशीर पंचनामा करून रोख रक्कम आणि ३० तोळे सोने असा सुमारे लाखोंचा ऐवज सायंकाळी उशिरा त्यांना परत केला.

यांचे प्रयत्न आणि अनर्थ टळला

पोलिस मुख्यालयातील द्वारका भागात नियुक्तीस असलेले स्वप्नील जाधव यांनी दोघींना भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात दिले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक वसंत पवार, उपनिरीक्षक योगेश माळी, सहाय्यक उपनिरीक्षक अब्दुल शेख, हवालदार शरद बाविस्कर, अंमलदार उत्तम खरपडे, किरण निकम, वाघ यांनी दोघींच्या कुटुंबीयांच्या शोध घेण्याचा प्रयत्न केला.

दोघींना विश्वासात घेऊन त्यांची चौकशी केली. तसेच त्यांच्या कर्तव्यदक्षतेने दोन्ही बॅगेतील लाखोंचा ऐवज संबंधितांना परत मिळाला. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळीच प्रयत्न केल्याने अनर्थ टळल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त झाली.

Police officers and staff while giving Panchnama of the gold ornaments and cash found in the bag to the concerned
Nashik Success Story : शेतकऱ्याचा मुलगा बनला विस्तार अधिकारी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.