Nashik NMC News : महापालिकेच्या जागेवरील दोन झोपडपट्ट्या होणार अधिकृत! नोटिशीद्वारे हरकती, सूचना मागविल्या

Latest Nashik News : याबाबत पंधरा दिवसात हरकती व सूचना मागविल्या आहेत. झोपडपट्टीस मान्यता मिळाल्यास अन्य विभागातील झोपडपट्ट्या अधिकृत करण्याची मागणीदेखील वाढणार आहे.
Nashik NMC
Nashik NMCesakal
Updated on

Nashik NMC News : नागपूरच्या धर्तीवर नाशिक महापालिका हद्दीतील झोपडपट्ट्यांमधील जागा झोपडीधारकांना भाडेपट्ट्यावर देण्याबरोबरच झोपडपट्टीवासीयांना हक्काची घरे देण्यासाठी बहुमजली घरे बांधण्यास परवानगी देण्याबरोबरच शासकीय जागेवरील झोपडपट्ट्यांवरील जागेवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.

असे असले तरीही अद्याप कारवाई झाली नाही. परंतु महापालिकेने स्वजागेवरील दोन झोपडपट्ट्या अधिकृत करण्याची नोटीस काढली आहे. याबाबत पंधरा दिवसात हरकती व सूचना मागविल्या आहेत. झोपडपट्टीस मान्यता मिळाल्यास अन्य विभागातील झोपडपट्ट्या अधिकृत करण्याची मागणीदेखील वाढणार आहे. (Two slums on NMC site will official)

शहराचा विस्तार वाढत असताना झोपडपट्ट्यांची संख्यादेखील वाढली आहे. २००६ मध्ये शहरात झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण केले. त्यात १५९ झोपडपट्ट्या असल्याचे निदर्शनास आले. यातील ५५ झोपडपट्ट्या अधिकृत, तर १०४ झोपडपट्ट्या अनधिकृत आढळल्या. ८२ झोपडपट्ट्या खासगी जागेवर, तर महापालिकेच्या जागेवर सहा व शासकीय जागांवर १६ झोपडपट्ट्या असल्याचे निदर्शनास आले.

असे असले तरीही मागील तेरा वर्षाचा झोपडपट्ट्यांची नव्याने सर्वेक्षण झाले नाही. ऑगस्ट २०२३ मध्ये विधानसभेतील एका प्रश्‍नाला उत्तर देताना नगर विकास विभागाने शहरातील अघोषित झोपडपट्ट्यांचे संरक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंत्रालयातील बैठकीत नागपूरच्या धर्तीवर नाशिकमधील झोपडीधारकांना भाडेपट्टी लागू करण्यासाठी येत्या प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शासकीय जागांवरील झोपडपट्ट्या घोषित असल्याचे समजून कारवाई करण्याच्या सूचना नगरविकास विभागाकडून दिल्या, परंतु कारवाई झाली नाही. परंतु शहरातील दोन झोपडपट्ट्या अधिकृत करण्यासाठी झोपडपट्टी विभागाने हरकती व सूचना मागविल्या आहेत.

या झोपडपट्ट्या होणार अधिकृत

नासर्डी नदीच्या बाजूला असलेल्या मध्य विधानसभा मतदारसंघातील शिवाजीवाडीतील नंदिनीनगर व भारतनगर येथील ७.१० हेक्टर क्षेत्रातील व महापालिकेची मालकी असलेल्या झोपडपट्टीला अधिकृत करण्यासाठी हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कस्तुरबानगर येथील झोपडपट्टीलादेखील अधिकृत दर्जा दिला जाणार आहे.

दाट लोकवस्ती, चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या झोपड्या, अरुंद सदोष बोळीतील रस्ते, अपुरा प्रकाश, नैसर्गिक विधीची अपुरी साधने अशा अवस्थेत असलेल्या व नागरिकांच्या आरोग्याला धोका पोचण्याचा संभव असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये नागरी सुविधा देण्यासाठी अधिकृत करणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. (latest marathi news)

Nashik NMC
Nashik NMC News : MNGL च्या मनमानीला महापालिकेचे नोटिशीने उत्तर! रस्त्याची तोडफोड केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

"नागरिकांच्या आरोग्याला धोका पोचण्याचा संभव असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये नागरी सुविधा देण्याच्या उद्देशाने दोन झोपडपट्ट्या अधिकृत करण्यासाठी नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. यावर हरकती व सूचनांची दखल घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल."

-मयूर पाटील, उपायुक्त, झोपडपट्टी सुधारणा विभाग.

शहरातील झोपडपट्ट्यांची स्थिती (२००६ नुसार)

एकूण झोपडपट्ट्या- १५९

घोषित- ५५

अघोषित- १०४

घोषित झोपड्यांची संख्या- २०,८८५

घोषित झोपडपट्ट्यांमधील लोकसंख्या- ९७,१२६

अघोषित झोपड्यांची संख्या- २०,५२२

अघोषित झोपडपट्ट्यांमधील लोकसंख्या- ९५,८३३

खासगी जागेवरील झोपडपट्ट्या- ११४

महापालिकेच्या जागेवरील झोपडपट्ट्या- १५

शासकीय जागांवरील झोपडपट्ट्या- ३०

झोपडपट्टीची स्थिती

- कस्तुरबानगर-

झोपड्या- १३५

कुटुंब- १४८

लोकसंख्या- ६२८

शिवाजीवाडी

झोपड्या- १२६८

कुटुंब- १२४५

लोकसंख्या- ६०२३

Nashik NMC
NDCC Bank News : जिल्हा बॅंकेला अर्थसहाय्यता मिळण्याची शक्यता धूसर! राजकीय उदासीनता; 650 कोटींचा प्रस्ताव शासन दरबारी पडून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.