Nashik Traffic Rules Break : शहरातील एकेरी मार्गावर दुतर्फा वाहने सुसाट! वाहतूक नियमाची सर्रास पायमल्ली

Nashik News : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित चालावी, यासाठी काही वर्दळीचे मार्ग एकेरी करण्यात आले आहेत.
Nashik Traffic Rules Break
Nashik Traffic Rules Breakesakal
Updated on

Nashik News : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित चालावी, यासाठी काही वर्दळीचे मार्ग एकेरी करण्यात आले आहेत. परंतु वाहतूक पोलिस यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे वर्दळीच्या मार्गावर असलेल्या एकेरी मार्गावर दुतर्फा वाहने चालवत सर्रास नियमांची पायमल्ली होत आहे. शहरातील अशोकस्तंभ ते रविवार पेठ, रविवार पेठ ते टिळक पथ सिग्नल. (Rampant violation of traffic rules)

मालेगाव स्टॅन्ड ते रामतीर्थ हे मार्ग वाहतूक सुरळीत होण्यासाठी एकेरी करण्यात आले आहेत. याशिवाय आणखी तीन चार मार्ग एकेरी करण्यात आले होते, परंतु पुढे धोरण बदलल्याने ते दुहेरी करण्यात आले. परंतु असे असूनही या वर्दळीच्या मार्गावर चक्क दुतर्फा वाहतूक सुरू आहे.रविवार कारंजा ते टिळक पथ सिग्नल हा तर चोवीस तास वर्दळीचा रस्ता आहे.

परंतु वाहतूक शाखेचा कर्मचारी हजर असूनही अनेक दुचाकीस्वार, रिक्षाचालक बिनबोभाट यामार्गावर वाहने हाकतात. अशोक स्तंभ ते रविवार कारंजा येथेही हीच स्थिती आहे. याठिकाणी अधूनमधून कारवाई होऊन दंडवसुलीही केली जाते. मात्र त्यात सातत्य नसल्याने वाहनधारक कोणालाच जुमानत नसल्याचे चित्र आहे. (latest marathi news)

Nashik Traffic Rules Break
Nashik District Bank : जिल्हा बॅंकेच्या सामोपचार योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ!

सीबीएसकडून कॅनडा कॉर्नरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी अर्धाच रस्ता उपलब्ध आहे. नियोजनानुसार हा रस्ता एकेरी करण्यात आलेला असूनही दोन्ही बाजूने वाहतूक सुरू आहे. हा रस्ता मोठ्या वर्दळीचा आहे. त्यामुळे लहानमोठे अपघातही होत आहेत. याठिकाणी काही काळासाठी एकेरी वाहतुकीचा फलक लावणे गरजेचे आहे.

पंचवटीत तीच परिस्थिती

पंचवटीतील मालेगाव स्टॅन्डवरून रामतीर्थाकडे जाता येते, परंतु रामतीर्थाकडून मालेगाव स्टॅन्डकडे येता येत नाही, यासाठी कपालेश्‍वर खांदवे सभागृह किंवा पंचवटी सार्वजनिक वाचनालयाकडून स्वतंत्र मार्ग असूनही बहुसंख्य वाहनधारक एकेरी मार्गावर वाहने चालवितात. हा रस्ता तीव्र उतारांचा आहे, परंतु तरीही खालच्या बाजूने वेगाने वाहने मालेगाव स्टॅन्डकडे येतात. विशेष म्हणजे येथे वाहतूक शाखेचा कर्मचारी उपस्थित असूनही त्याकडे कानाडोळा केला जातो.

Nashik Traffic Rules Break
Nashik Police Recruitment : मैदानी चाचणीला महिलांची दमछाक! तृतीयपंथी उमेदवारांची दांडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.