SAKAL Exclusive : शहरात जोरात चाले दुचाकी चोरीचा खेळ; सप्टेंबर महिन्यात 62 वाहने चोरीला

SAKAL Exclusive : शहर आयुक्तालय हद्दीमध्ये दुचाकी चोरट्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. सप्टेंबर महिन्यात तब्बल ६४ वाहने चोरट्यांनी लांबविली आहेत.
two wheeler theft
two wheeler theftesakal
Updated on

नाशिक : शहर आयुक्तालय हद्दीमध्ये दुचाकी चोरट्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. सप्टेंबर महिन्यात तब्बल ६४ वाहने चोरट्यांनी लांबविली आहेत. यात महागड्या बुलेटसह दुचाकी, रिक्षा, कार आणि एका ट्रकचाही समावेश आहे. वाहने चोरी गुन्ह्यांच्या तुलनेमध्ये उकल होण्याचे वा वाहने सापडण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. चोरीच्या या घटनांमुळे वाहनचालकांमध्ये मात्र असुरक्षिततेची भावना असून, पार्क केलेले वाहन परत आल्यानंतर त्याच जागी मिळेल, याची कोणतीही शाश्वती नाही. (two wheeler theft game is going strong in city 62 vehicles were stolen in month of September)

तर दुसरीकडे पोलिसांसमोरही चोरट्यांनी आव्हान उभे केल्याचे दिसते. दोन दिवसांपूर्वीच म्हसरुळ पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीच्या ११ दुचाकी हस्तगत केल्या होत्या. केवळ मौजमजेसाठी ते महागड्या दुचाकी चोरायचे. कमी किमतीमध्ये विक्री करीत त्या पैशातून महागडे फोन घेणे, मौजमजा करायचे.

तर, शहर गुन्हे शाखेच्या मोटारसायकल चोरी शोध पथकानेही एकास परजिल्ह्यातून अटक केली होती. त्याच्याकडूनही चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. असे असले तरी चोरी गेलेल्या वाहनांच्या तुलनेमध्ये वाहनांचा शोध वा दुचाकी चोरटे जेरबंद करण्याचे प्रमाण कमी आहे. वाहनचोरी रोखण्यासाठी आयुक्तांनी स्वतंत्र पथक नेमले असले तरी, या दुचाकी चोरट्यांचे आव्हान शहर पोलिसांसमोर कायम आहे.

- अशी ठेवतात पाळत

- दिवसा वर्दळीच्या ठिकाणी पार्क वाहनांवर लक्ष

- रात्रीच्यावेळी अपार्टमेंटमधील वाहने लक्ष्य

- चोरलेल्या वाहनाची नंबरप्लेट बदलून ग्रामीण भागात व परजिल्ह्यात विक्री

- गॅरेजवाला वा भंगारवाल्यास कमी किमतीत विक्री

- ग्रामीण भागात कागदपत्रे नंतर आणून देण्याचे सांगत आठ-दहा हजार रुपये घेतात

- भंगारमध्ये दिल्यास काही मिनिटांत वाहनाचे पार्ट मोकळे करून विक्री (latest marathi news)

two wheeler theft
SAKAL Exclusive : 2 वर्षे उलटूनही स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकप्रतिनिधी नसल्याने नागरिकांची तारांबळ

ही आहेत चोरीची ठिकाणे

- गोदाघाटावरील यशवंत महाराज पटांगण

- जिल्हा शासकीय रुग्णालय आवार

- ठक्कर बाजार, मेळा बसस्थानक, सीबीएस

- खासगी हॉस्पिटल्सबाहेरील रस्त्यालगतची पार्किंग

- लॉन्सबाहेरील पार्किंग

- दिंडोरी रोडवरील बाजार समिती आवार

- उपनगरीय भाजी मार्केटबाहेरील पार्किंग

- अपार्टमेंटचे पार्किंग/ कॉलनी रस्त्यालगत पार्क वाहने

पार्किंग टार्गेट

चोरट्यांकडून शहरातील दुचाकी वाहनांच्या पार्किंग टार्गेट केल्या जातात. शासकीय कार्यालये, रुग्णालये, व्यापारी पेठा येथे रस्त्यालगत पार्क केलेल्या दुचाकी अवघ्या काही मिनिटांत चोरटे लंपास करतात. विशेषत: मोपेडमध्ये ॲक्टिवा, दुचाकींमध्ये शाईन, स्प्लेंडर, बुलेट अशी वाहने चोरीचे प्रमाण लक्षणीय आहे. चोरट्यांकडून ही वाहने ग्रामीण वा परजिल्ह्यात अत्यंत कमी किमतीमध्ये विक्री होतात.

two wheeler theft
SAKAL Exclusive : 40 हजार वॉटर बँकेतून कोरडवाहू शेती झाली बागायती! नाशिक जिल्ह्यात शेततळ्याने आणली क्रांती

- पोलिस ठाणेनिहाय वाहनांची आकडेवारी

पंचवटी : १३

आडगाव : ११

उपनगर : ८

भद्रकाली : ४

मुंबई नाका : ४

सरकारवाडा : ४

सातपूर : ४

अंबड : ३

नाशिकरोड : ३

गंगापूर : ३

इंदिरानगर : २

म्हसरुळ : २

देवळाली कॅम्प : १

एकूण : ६४

- वाहनांचे प्रकार

मोपेड : १७

बुलेट : ४

रिक्षा : ३

कार : १

ट्रक : १

दुचाकी : ३८

एकूण : ६४

एकूण किंमत : २४,३१,००० रुपये (latest marathi news)

two wheeler theft
SAKAL EXCLUSIVE: अर्धे वर्ष संपूनही पावणेदोन लाख विद्यार्थी गणवेशापासून वंचित; केवळ 89 हजार 410 विद्यार्थ्यांना मिळाले गणवेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.