ओझर : दुर्गम भागातील उमराळे ता. दिंडोरी येथील गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कुल या इंग्रजी माध्यम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2024-25 पासुन मोफत शिक्षण देण्याचा धाडसी निर्णय संस्थेचे अध्यक्ष हरबीर चौधरी व संचालक शालू चौधरी यांनी घेतला आहे. मोफत शिक्षण देणारी उमराळे येथील गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कुल महाराष्ट्रात पहिली खासगी शाळा ठरणार आहे. (Nashik Umrale free education to all students marathi news)
संस्थेचे अध्यक्ष हरबीर चौधरी व संचालक शालू चौधरी यांनी सकाळला अधिक माहिती देतांना सांगितले, की ग्रामीण व आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, या भागातील मुले मुली शिक्षणापासून वंचित राहू नये, इग्रजी माध्यमाच्या शिक्षणासाठी या मुलांना कुठलीही अडचण येऊ नये, या उद्देशाने बालेश एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्रजी माध्यमाची गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कुल ही शाळा उमराळे ता. दिंडोरी. जि. नाशिक येथे एक वर्षापूर्वी सुरू केली असुन शाळेत इ्यत्ता 1ली ते इ्यत्ता 10 वी पर्यंतचे वर्ग भरतात.
शाळेत एकूण 175 विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थी व पालक यांचे शाळेला उत्तम सहकार्य मिळते. एकदंर दुर्गम भागातील परिस्थिती बघता या भागातील सर्वच विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, म्हणून सैन्यदलाची पार्श्वभूमी असलेले संस्थेचे अध्यक्ष हरबीर चौधरी व शालु चौधरी यांनी ही शाळा सर्व विद्यार्थ्यांसाठी निशुल्क करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)
"उमराळे ता. दिंडोरी येथील शाळेतील 300 विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विनामुल्य कुठल्याही प्रकारची शैक्षणिक शुल्क न घेता शिक्षण देण्याचे लक्ष संस्थेने ठरवले आहे. विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण देण्याचा हा निर्णय ही शाळा व संस्था असेपर्यंत म्हणजेच कायमस्वरूपी असणार आहे. समाजातील समाजप्रेमी व सेवाभावी घटकांना सोबत घेऊन ग्रामीण भागात आणखी असे उपक्रम हाती घेण्याचा मानस आहे"
- हरबीर चौधरी व शालूचौधरी, गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कुल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.