Nashik Water Cut : शहरात अघोषित पाणी कपात? नाशिककरांवर पाण्याचे संकट!
Nashik Water Cut : उन्हाचे चटके जाणवू लागल्यानंतर आता महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागासमोर पाण्याचा तुटवडा भरून काढण्याचे आव्हान आहे. शहरासाठी राखीव ठेवलेल्या एकूण पाण्यात अठरा दिवसांची तूट आहे. ही तूट भरून काढण्यासाठी उन्हाळ्यात कमी-अधिक पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले जात असले तरी एवढ्याने अठरा दिवसांच्या पाण्याचा शॉर्ट फॉल भरून निघणार नाही. त्यामुळे गंगापूर धरणात चर खोदण्याचा निर्णय घेतला. (Nashik Unannounced water cut in city from nmc marathi news)
परंतु आचारसंहिता लागू झाल्याने सर्वेक्षण लटकल्याने नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट घोंघावत असून शहरात पाणी पुरवठा यंत्रणेच्या दुरुस्तीच्या नावाखाली पाणी पुरवठा बंद करून कपात तर केली जात नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने मराठवाड्यासाठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या.
परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर जवळपास दीड टीएमसी पाण्याची बचत झाली असली तरी त्यापूर्वी जायकवाडीसाठी पाणी सोडले गेले. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या आरक्षणात कपात करण्यात आली. महापालिकेने पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन ६१०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी नोंदविली. परंतु धरणांतील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता आरक्षणात कपात केली.
नाशिकसाठी ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले. शहराला दररोज २० दशलक्ष घनफूट पाणी पुरवठा होतो. सद्यस्थितीत उपलब्ध पाण्याचा विचार करता ३१ जुलैपर्यंत पाणी पुरवावे लागणार आहे. परंतु रोजचा पाणी वापर लक्षात घेता अठरा दिवसांच्या पाण्याचा शॉर्टफॉल निर्माण होत आहे. (latest marathi news)
अठरा दिवसांचा पाण्याचा शॉर्टफॉल भरून काढण्यासाठी डिसेंबरपासून आठवड्यातील दर शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव विरोधामुळे मागे पडला. अठरा दिवसांचा शॉर्ट फॉल कमी करण्यासाठी प्रशासनाकडून कमी-अधिक पुरवठा करून शॉर्टफॉल भरून काढण्याचे प्रयत्न आहेत.
विशेष परवानगी घेणार
पाणी पुरवठा विभागाकडून विभागनिहाय दुरुस्तीची मोठी कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचबरोबर विद्युत विभागही मुख्यत्वे शनिवारी दुरुस्तीची कामे घेतो. यातून पाणी पुरवठा विभागाने अठरा दिवसांचा शॉर्टफॉल भरून काढण्यासाठी अघोषित पाणी कपात केल्याचा संशय आहे. गंगापूर धरणाच्या मध्य भागातील पाणी जॅकवेल पर्यंत आणण्यासाठी चर खोदली जाणार आहे.
या माध्यमातून अठरा दिवसांचा शॉर्ट फॉल भरून काढण्याबरोबरच धरणातील मृत जलसाठा उपयोगात आणता येईल. सर्वेक्षण करण्यासाठी निविदा काढली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने गंगापूर धरणात चर खोदण्याची प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. त्यामुळे निविदा उघडण्यासाठी निवडणूक आयोगाकडे विशेष परवानगी घेतली जाणार आहे.
शहरासाठी पाण्याचे आरक्षण (दशलक्ष घनफूट)
- गंगापूर धरण- ३८०७
- दारणा व मुकणे धरण- १५०७
- एकूण आरक्षण- ५३१४
पाण्याचा वापर (दशलक्ष घनफूट)
- १५ ते ३१ ऑक्टोबर- ३३४.६५
- एक ते ३० नोव्हेंबर- ५९३.६७
- एक ते ३१ डिसेंबर- ५९५
- एक ते ३१ जानेवारी- ६११.२७
- एक ते २९ फेब्रुवारी - ५७८.९८
- एक ते २० मार्च - ३८६.१२
एकूण वापर- ३०९९.६९
----------------------------------
एकूण शिल्लक पाणी- २२१४.३०५ दशलक्ष घनफूट.
-----------------------------------
दररोजचा पाणी वापर- ५५५.८ दशलक्ष लिटर्स.
------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.