Nashik Water Shortage : हंडाभर पाणी अन्‌ तासभर थांब! पंचवटीतील अनेक भागात अघोषित पाणीबाणी

Water Shortage : पंचवटीतील टकलेनगर, कृष्णनगर, गणेशवाडी, सहजीवननगर, दातेनगरसह म्हसरूळ परिसरातील बोरगड, किशोर सूर्यवंशी मार्ग, पुष्पकनगर परिसरात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे.
This is a representative morning scene in an AK Heights society in Mhasrul area.
This is a representative morning scene in an AK Heights society in Mhasrul area.esakal
Updated on

Nashik Water Shortage : पंचवटीतील टकलेनगर, कृष्णनगर, गणेशवाडी, सहजीवननगर, दातेनगरसह म्हसरूळ परिसरातील बोरगड, किशोर सूर्यवंशी मार्ग, पुष्पकनगर परिसरात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीपुरवठा सुरू होताच सुरवातीला थेंबथेंब येणारे पाणी परिसरातील विद्युत मोटारी सुरू होताच बंद होत असल्याचा अनुभव अनेकांनी कथन केला. (nashik Unannounced water shortage in many areas of Panchavati marathi news)

पंचवटीतील बहुतांश भागात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या महिलांच्या तक्रारी आहेत. महापालिकेने विद्युत मोटारी जप्त करण्याबाबत सूतोवाच काही काळापूर्वी केले होते, परंतु त्यावर ठोस कारवाई न झाल्याने मोठ्या प्रमाणावर विद्युत मोटारीद्वारे पाणी खेचले जात आहे.

त्यामुळे ज्यांच्याकडे विद्युत मोटारी आहेत, त्यांच्याकडे धो-धो तर त्याच्या अगदी शेजारच्या घरांत हंडाभर पाण्यासाठी पंधरा- वीस मिनिटे वाट पहावी लागत असल्याच्या नागरिकांनी सांगितले. पावसाळ्यास अद्याप तीन साडेतीन महिन्यांचा कालावधी आहे. आताच अशी परिस्थिती तर मे, जूनमध्ये कशी परिस्थिती असेल, याबाबत महिलावर्ग धास्तावला आहे. (latest marathi news)

This is a representative morning scene in an AK Heights society in Mhasrul area.
Nashik Water Shortage : धरणांमध्ये यंदा अवघे 34 टक्केच पाणी; रिमझिम पावसामुळे धरणसाठ्यात अत्यल्प वाढ

दंडात्मक कारवाई व्हावी

गंगापूर धरणाने तळ गाठल्याने भविष्यात नाशिकला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी सर्वांनी जपून वापरण्याची अपेक्षा आहे. परंतु याही स्थितीत अनेक ठिकाणी चक्क नळी लावून सडा टाकला जात आहे. महापालिकेच्या पाणीपुवरठा विभागाने याबाबत अधिक दक्ष राहून पाण्याचा अपव्यय करणारांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी आहे. याशिवाय अनेक पाणपोईवर कोणीही नसताना नळ सुरूच असल्याचे दिसून येते. त्यामुळे तेथील पाणीपुरवठाही बंद करण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली.

एकवेळ पण योग्य दाबाने व्हावा पुरवठा

शहराच्या गावठाण भागात दिवसातून दोन वेळेस पाणीपुरवठा होतो. दुपारी अतिशय अल्प दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने महिलांना पाणी भरण्यासाठी भल्या पहाटे उठावे लागते. त्यामुळे गावठाण भागात पहाटे साडेचारपासून पाण्यासाठी उठावे लागत असल्याचा अनुभव अनेक महिलांनी सांगितला. शिवाय पहाटे उठूनही पाणी मिळेलच याचीही शाश्‍वती नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे एकवेळ का होईना पण योग्य दाबाने पाणीपुरवठ्याची मागणी आहे.

''आमच्याकडे मनपाची अधिकृत नळजोडणी आहे, परंतु नळाला पिण्यासाठी पुरेसे पाणीच येत नसल्याने अन्य ठिकाणांहून पाणी आणावे लागत आहे.''- संगीता सूर्यवंशी, रहिवासी

This is a representative morning scene in an AK Heights society in Mhasrul area.
Nashik Water Shortage: नाशिक जिल्ह्यात उरला 44 टक्के जलसाठा! 31 जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे आव्हान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.