Nashik Water Crisis : अघोषित पाणीकपातीमुळे नाशिककर वेठीस; शहरात दिवसभर पाणीपुरवठा बंद

Nashik News : गंगापूर धरणात आरक्षित करण्यात आलेल्या पाण्यात जवळपास १९ दिवसांचा शॉर्टफॉल असल्याने तो भरून काढण्यासाठी महापालिकेने दुरुस्तीच्या नावाखाली संपूर्ण दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवला.
As there was no water in the city on Saturday, there was a huge demand for tankers, senior citizens and children were carrying water on bicycles in Satpur area.
As there was no water in the city on Saturday, there was a huge demand for tankers, senior citizens and children were carrying water on bicycles in Satpur area.esakal
Updated on

Nashik News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात आरक्षित करण्यात आलेल्या पाण्यात जवळपास १९ दिवसांचा शॉर्टफॉल असल्याने तो भरून काढण्यासाठी महापालिकेने दुरुस्तीच्या नावाखाली संपूर्ण दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवला. त्यामुळे अख्खे शहर या अघोषित पाणीकपातीमुळे वेठीस धरले गेले. (Unannounced water shortage in Nashik)

नळांना पाण्याचा थेंब न आल्याने पंचवटी भागातील महिलांनी थेट गोदावरी नदीत धुणे-भांडी केली. जुने नाशिकमध्ये सार्वजनिक नळांना पाणी येईल या आशेने सकाळपासून हंडे नंबरमध्ये ठेवण्यात आले. सातपूरचा कामगार वर्ग सुटीच्या दिवशी पाण्यासाठी बाहेर पडला. मोठ्या सोसायट्यांमध्ये बाहेरून टॅन्करने पाणी मागवून टाक्या भराव्या लागल्या.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवितरण वाहिनी व उपवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम महापालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून हाती घेण्यात आले. त्यामुळे शनिवारी (ता. २५) दिवसभर बंद, तर रविवारी (ता. २६) कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. वास्तविक दुरुस्तीचे नाव असले तरी अप्रत्यक्ष पाणीकपात आहे.

मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यात आले. परिणामी कमी प्रमाणात पाणी आरक्षित करण्यात आले. कमी पाणी आरक्षणामुळे जवळपास १९ दिवसांचा पाण्याचा शॉर्टफॉल निर्माण होणार आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या नावाखाली पाणीकपात प्रशासनाकडून सुरू आहे. शनिवारी दिवसभर पाणी बंद ठेवणे हा त्याचाच एक भाग मानला जात आहे. (latest marathi news)

As there was no water in the city on Saturday, there was a huge demand for tankers, senior citizens and children were carrying water on bicycles in Satpur area.
Nashik ZP News : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना यंदा ‘ब्रेक’

गावठाण भागात तारांबळ

दिवसभर पाणी नसल्याने विशेष करून पंचवटी, जुने नाशिक तसेच शहरातील गावठाण भागात नागरिकांना समस्येला सामोरे जावे लागले. पंचवटी गावठाणातील नागरिकांनी धुणे-भांडी गंगाघाटावर केली. म्हसरुळ भागात साठविलेल्या पाण्यावर काम भागवावे लागले. जुने नाशिक मध्ये भांड्यांमध्ये साठविलेल्या पाण्यावर दिवस काढावा लागला.

सातपूर औद्योगिक वसाहतीत शुक्रवारी सेकंड शिपच्या कामगारांना शनिवारी पाणी नसल्याने त्रास झाला. नाशिकरोड भागात रोकडोबा वाडी, जयभवानी रोड या भागात टंचाई जाणवली. कॅनॉलरोड झोपडपट्टी, गांधीनगर, उपनगर भागात टंचाईमुळे नागरिक रस्त्यावर आले.

भरउन्हात पाण्यासाठी वणवण

सातपूर : शनिवारी सकाळपासून औद्योगिक, कामगार वसाहतीत पाण्यासाठी महिला व नागरीकांना वणवण भटकावे लागले. सकाळी कामावर जाण्याची कामगारांना घाई असते. शनिवार असला तरी अनेक कंपन्यांनी मतदानासाठी सुटी दिल्याने तो दिवस भरण्यासाठी शनिवारी उत्पादन सुरू ठेवले होते त्यामुळे नेहमीप्रमाणे महिलांना पाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. नागरिक पाण्यासाठी वणवण भटकताना पाहायला मिळाले. खासगी टॅंकरचालकांनी दर वाढविल्याचे पाहायला मिळाले. जादा पैसे देवूनही अनेक सोसायट्यांना पाणी उपलब्ध झाले नाही.

As there was no water in the city on Saturday, there was a huge demand for tankers, senior citizens and children were carrying water on bicycles in Satpur area.
Nashik Police Promotion : सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उपनिरीक्षकपदी बढती! सुखद धक्का; शहर आयुक्तालयातील 5 जणांचा समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.