Nashik ZP News : शिक्षण सशक्तीकरणासाठी महत्त्वाचे शस्त्र : आशिमा मित्तल

Nashik News : ‘सुपर ५०’ या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जेईई मेन्स तसेच ऍडव्हान्स परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेकडून सन्मान करण्यात आला.
Chief Executive Officer Ashima Mittal during the honor program of Super Fifty students by Zilla Parishad administration.
Chief Executive Officer Ashima Mittal during the honor program of Super Fifty students by Zilla Parishad administration.esakal
Updated on

Nashik News : जिल्हा परिषदेकडून २०२२ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘सुपर ५०’ या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जेईई मेन्स तसेच ऍडव्हान्स परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेकडून सन्मान करण्यात आला. या वेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी शिक्षण हे सामाजिक सशक्तीकरणासाठी महत्त्वाचे शस्त्र असल्याचे सांगत सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयत्नात सातत्य राखण्याचे आवाहन केले. (Nashik ZP News)

नाशिक जिल्हा परिषदेकडून २०२२ ते २०२४ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती- जमाती प्रवर्गातील ५० विद्यार्थ्यांना जेईई, सीईटी व जेईई ॲडव्हान्स परीक्षांचे परीक्षांसाठी निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण देण्यात आले. सलग दोन वर्षाच्या निवासी स्वरूपाच्या अभ्यासक्रमानंतर ५० विद्यार्थ्यांपैकी २२ विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण होऊन सदर विद्यार्थ्यांनी २६ मेस जेईई ऍडव्हान्स परीक्षा दिली होती.

यापैकी ७ विद्यार्थी हे जेईई ऍडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. या सर्वच विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेकडून प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी उपाध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. तिवारी, गुरुगोविंदसिंग महाविद्यालयाचे डॉ. सी. डी. मोहोळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील. (latest marathi news)

Chief Executive Officer Ashima Mittal during the honor program of Super Fifty students by Zilla Parishad administration.
Nashik ZP News : एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जिल्हा परिषदेची नोंद!

उपशिक्षणाधिकारी उदय देवरे, नवजीवन डे एज्युकेशनचे सुभाष देशमुख, गट शिक्षण अधिकारी मिता चौधरी यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. ग्रामीण भागातून आलो म्हणून कोणताही न्यूनगंड मनात न ठेवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन डॉ. गुंडे यांनी केले. गुरुगोविंदसिंग महाविद्यालयाचे मनोज कोळी यांनीही माहिती दिली.

सुरेश गायकवाड, वृषाली वाघमारे, अश्विनी बोरसे या विद्यार्थ्यांनी तसेच के. के. वाघ महाविद्यालयाचे डीन चांदवडकर यांनी प्रवेशाबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती पाहता त्यांना प्रवेशासाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी आयडीबीआय, एसबीआय बँकेचे मॅनेजर उपस्थित होते. त्यांनी बॅंकेमार्फत मनोगत व्यक्त केले.

Chief Executive Officer Ashima Mittal during the honor program of Super Fifty students by Zilla Parishad administration.
Nashik News : ‘काश्‍यपी’मधून गंगापूर धरणात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.