school students will be given varied nutrition food in diet
school students will be given varied nutrition food in dietesakal

Nashik News : विद्यार्थ्यांना शाळेत मिळणार चवदार पदार्थांची मेजवानी; प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आहारात सुधारणा

Nashik News : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आगामी शैक्षणिक वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारात सुधारणा करून वैविध्यपूर्ण पोषण आहार दिला जाणार आहे.
Published on

नामपूर : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आगामी शैक्षणिक वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारात सुधारणा करून वैविध्यपूर्ण पोषण आहार दिला जाणार आहे. त्यात तीन संरचित आहार पद्धतीनुसार व्हेजिटेबल पुलाव, अंडा पुलाव, तांदळाची खिचडी अशा पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत चवदार पदार्थांची मेजवानी मिळणार आहे. (school students will be given varied nutrition food in diet for coming academic years)

देशातील शाळांमधून राबविली जाणारी, सर्वांत जादा लाभार्थी असणारी योजना म्हणजे शालेय पोषण आहार योजना होय. शालेय पोषण आहार योजना ही केंद्र शासनपुरस्कृत आहे. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने तसेच, प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटनोंदणीचे व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनाने १९९५-९६ सालापासून ही योजना लागू केली आहे. सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे चालविण्यात येत असलेल्या योजना प्राथमिक शाळा तसेच, अनुदानित खासगी प्राथमिक शाळांतील पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना ही योजना लागू करण्यात आली. त्यानंतर आठवीच्या विद्यार्थ्यांपर्यंत तिचा विस्तार करण्यात आला. केंद्र शासनाने दिलेल्या सुचनेनुसार विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध अन्नधान्य.

तृणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश करुन आहाराचा दर्जा आणि पौष्टिकता वाढवणे, आहारात वैविध्य आणण्यासाठी वृध्दिंगत करणे, आहारात वैविध्य आणण्यासाठी पाककृती सुधारणा समिती नियुक्त करण्यात आली होती. राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये निर्माण केल्या जात असलेल्या परसबागांतून उत्पादित भाजीपाला, फळे यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात होत असल्याने विद्यार्थ्यांना ताजा, सकस आहार मिळण्यास मदत होत आहे. (latest marathi news)

school students will be given varied nutrition food in diet
Nashik News : पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलाचे काम युद्ध पातळीवर सुरू

पाककृतीच्या स्वरुपात आहार

राज्यातील पात्र शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. तसेच, योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो. सद्यस्थितीत तांदूळापासून बनवलेल्या पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहार दिला जात आहे.

तीन संरचित आहाराची शिफारस

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी डिसेंबर २०२३ पासून विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडी आणि फळे वाटप केली जात आहेत. आहारात वैविध्यता आणून तांदूळ, डाळी, कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर, नाचणी सत्व यांचा समावेश असलेला तीन संरचित आहार देण्याची शिफारस करण्यात आली होती.

त्यानुसार निश्‍चित केलेल्या पाककृतींमध्ये व्हेजिटेबल पुलाव, अंडा पुलाव, मसाले भात, मोड आलेल्या मटकीची उसळ, मटार पुलाव, गोड खिचडी, मुगडाळ खिचडी, चवळी खिचडी, मूग, शेवगा, वरण भात, तांदळाची खीर, चणा पुलाव, नाचणीचे सत्व, सोयाबीन पुलाव, मोड आलेले कडधान्य या पाककृती निश्‍चित करण्यात आल्या आहेत.

school students will be given varied nutrition food in diet
Nashik Monsoon News : मनमाडला दुसऱ्या दिवशीही मुसळधार; पानेवाडी-आव्हाड वस्ती रस्ता गेला वाहून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.