Nashik News : विशेष मोहिमेंतर्गत बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा; इ-चलानद्वारे दंड आकारणी

Nashik : शहरातील वाहतुकीला सर्वाधिक अडथळा बेशिस्त रिक्षांचा होतो. चौकांमध्ये बेशिस्तपणे पार्किंग केली जाते.
Traffic police taking action against drivers who flout traffic rules.
Traffic police taking action against drivers who flout traffic rules.esakal
Updated on

Nashik News : शहरातील वाहतुकीला सर्वाधिक अडथळा बेशिस्त रिक्षांचा होतो. चौकांमध्ये बेशिस्तपणे पार्किंग केली जाते. प्रवाशांशी मुजोरी केली जाते. यामुळे वाहतूक शाखेने विशेष मोहिमेंतर्गत मंगळवारी (ता.२३) बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात धडक कारवाईचा बडगा उगारून १६० केसेस केल्या. यातून वाहतूक शाखेने सुमारे ७९ हजार ३०० रुपयांचा ऑनलाइन इ-चलानद्वारे दंड आकारला आहे. (Nashik Under special campaign action against unruly rickshaw drivers in city marathi news)

पोलिसांच्या या कारवाईमुळे बेशिस्त रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहेत. शहर पोलिस वाहतूक शाखेकडून आयुक्तालय हद्दीमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या अंतर्गत मंगळवारी वाहतूक शाखेने बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात कारवाई केली.

Traffic police taking action against drivers who flout traffic rules.
Nashik News : शहर आयुक्तालयात मनाई आदेश लागू!

वाहतूक शाखेच्या चारही विभागांत रिक्षा परवाना नसणे, गणवेश नसणे, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी, फ्रंटसिट प्रवासी, नो-पार्किंगमध्ये रिक्षा पार्किंग, वाहतुकीला अडथळा करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात वाहतूक शाखेने ऑनलाइन इ-चलानद्वारे दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये सुरू आहे.

विनाहेल्मेटच्या २०५ केसेस

शहर वाहतूक पोलिस शाखेने विनाहेल्मेट, सिटबेल्ट न वापरणाऱ्या कारचालकांविरोधातही दंडात्मक कारवाई केली आहे. त्यानुसार, विनाहेल्मेटच्या २०५ केसेस करीत १ लाख २ हजार ५०० रुपयांचा दंड तर, विना सिटबेल्टच्या ६८ केसेस करीत १३ हजार ६०० रुपयांचा दंड इ-चलानद्वारे आकारला. एकूण २७३ केसेसमधून वाहतूक शाखेने १ लाख १६ हजार१०० रुपयांचा दंड आकारला आहे.

Traffic police taking action against drivers who flout traffic rules.
Nashik News : एसटीत समन्वयाअभावी प्रवाशांना मनस्ताप! घाट दुरूस्तीसाठी बंद, तरीही तलवाडेचे तिकिट देत मध्येच उतरविले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.